मी आरोग्याच्या तक्रारी, आर्थिक समस्या,कौटुंबिक समस्या यांसारख्या बर्याच समस्यांनी ग्रस्त होतो. मी वास्तुशास्त्र आणि त्याचे फ़ायदे यापासून वंचित होतो. मुंबईसारख्या शहरात जागेअभावी छोट्या छोट्या खोल्यांमध्ये रहावे लागते पण एकेदिवशी साम टि.व्ही वरील महाराष्ट्र कॉलिंग हा प्रोग्राम आम्ही पाहिला व त्यात वक्ते म्हणून मकरंद सरदेशमुख सर होते. त्यादिवशी ते म्हणाले होते की कोणत्याही तोडफ़ोडीशिवाय वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आपण लहान घरात देखील आनंदाने राहू शकतो. त्यांचे ते वाक्य अजूनही मला आठवते. आम्ही त्यांची वास्तु व्हिजिट घेण्याचे ठरवले व नाव नोंदणी देखील केली. सरांच्या वास्तु व्हिजिट दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत आमच्या वास्तुमध्ये व आमच्या वागणुकीमध्ये बरेच चांगले बदल झाले. आमचे प्रश्न / समस्या सुटत गेल्या आणि आता आम्ही आपआपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम करत आहे. माझे आर्थिक तसेच आरोग्याच्या बाबतीतील प्रश्न सुटले आहेत.