माणसाला उत्तम आयुष्यासाठी अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा चांगल्या असणे महत्त्वाचे आहे. त्यात निवारा म्हणजे घर हे चांगले असणे गरजेचे आहे. यासाठी निसर्गनियमानुसार आपले घर कसे असावे, कसे बांधावे याचे प्राचीन शास्त्र आहे. वैदिक वास्तुशास्त्र याचे संदर्भ असणे गरजेचे आहे. यासाठी निसर्गनियमानुसार आपले घर कसे असावे, कसे बांधावे याचे प्राचीन ग्रंथ, वेद पुराणात सापडतात. मयमतम, विश्वकर्मा, प्रकाश अवस्था हे प्रमुख राहणार्या माणसाचे आरोग्य उत्तम राहील, ही यामागील संकल्पना वास्तुशास्त्राची आहे.
उत्तम आरोग्यासाठी
- उत्तर किंवा पश्चिम दिशेकडे पाय करुन झोपावे. पूर्व किंवा दक्षिणेकडे पाय करुन झोपू नये.
- घराचा भिंती तडा गेलेल्या, रंग उडालेल्या, बुरशी, ओल, शेवाळे आलेल्या नसाव्यात.
- बिम-लॉफ्ट-पोटमाळा याखाली बेड नसावा.
- बेडसमोर आरसा, ड्रेसिंग टेबल नसावा.
- झोपताना मोबाईल पायापाशी किंवा 5/6 फूट लांब ठेवावा.
- घर विकत घेताना भरपूर सुर्यप्रकाश, मोकळी – हवा खेळती आहे, असाच फ्लॅट, घर घ्यावे.
- ज्या घरामध्ये कोंदट वातावरण, अंधार, घाणीचे साम्राज्य असते, तेथे आरोग्यहीन कायम होते.
- घरामध्ये लाल – काळ्या डार्क रंगाचे भिंतीचे रंग पडदे नसावेत.
- टॉयलेट, बाथरुम कायम स्वच्छ, साफ़ ठेवावे.
- टॉयलेट मध्ये बाऊलमध्ये खडे मीठ ठेवणे, दर महिन्याने बदलणे.
- टॉयलेट, बाथरुम दरवाजे कायम बंद ठेवणे.
- घरामध्ये प्राण्यांची तोंडें, भयावह चित्रे, युद्धाचे प्रसंग आदी पोस्टर लावणे टाळावे.
- रोज खडे मीठाने फरशी पुसावी.
- महिन्यातून 1 वेळेस घराचे भिंती पुसून घेणे.
- घरामध्ये जाळ्या – जळमटे, झुरळे, पाली, ढेकूण होऊ देऊ नये.
- गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, भट्टी, ओव्हन ईशान्य/उत्तर दिशेत येऊ देऊ नयेत.
- घरामध्ये अडगळ, भंगार, बंद पडलेल्या जुन्या टाकाऊ वस्तूंचा साठा करणे टाळावे.
- दारे, खिडक्या, सेफ़्टी डोअर यांच्या बिजागिर्यांवर खोबरेल तेल अथवा ग्रीस सोडावे, त्यामुळे करकर आवाज थांबतो.
- घराच्या खिडक्या गंजल्या-तुटल्या-फुटल्या/कुजल्या असतील त्या बदलाव्या.
- नवीन फ़्लॅट, बंगलो, प्लॉट घेताना, बांधकाम करताना वास्तुतज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन घ्यावे.
- सुंदर, सुवासिक फ़ुलझाडे घरात कुंड्यांमध्ये किंवा बागेत लावावे.
- रोज सकाळी भक्तिगीते, मंत्र, आनंदी, उत्साही गाणी लावून दिवसाची सुरवात सुंदर करावी.
- बेडखाली बंद पडलेल्या वस्तू, भांडी, काचसामान, जुनी कागदपत्रे नसावी.
- आग्नेय-दक्षिण नैऋत्येला विहीर, बोअरिंग, पाण्य़ाची टाकी येऊ देऊ नये.
0