वास्तु टिप्स

 • आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते.
 • उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते.
 • आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल.
 • बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात.
 • आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
 • घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये .
 • भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये .
 • झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले मिळते.
 • घरातील वय वर्ष २५ ते ६० असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे. उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे.
 • घरामध्ये अडगळ ,भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबविण्यासारखे आहे.
 • घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्ज-बाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात.
 • नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहुन घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते.
 • नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी.
 • नवीन घर घेताना दक्षिण ,पश्चिम ,नैऋत्य आणि आग्नेय या दिशातुन येणारे दरवाजे टाळावेत.
 • भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबु  ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा.
 • घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ उर्जा भक्कम रहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे.
 • घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले ,पाने ,सुकलेली तोरणे काढून टाकावीत . म्हणजे घरामध्ये शुभ उर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाहीत.
 • घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पुर्व भिंतींवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पुर्व व उत्तर या शुभ दिशांना होते.
 • घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतींवर लावावीत म्हणजे कॅलेंडर कडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते.
 • कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पुर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते .
 • झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजारपण वाढते आणि माणुस कर्ज बाजारी होतो .
 • घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेऊ नये. ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते .
 • सुख-समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा .
 • बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती, फोटो असु नये .
 • लाल , काळा , मरून , हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरा मध्ये सुख - समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात .
 • झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये . त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो .
 • घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणुन मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे .
 •  दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्न हर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे .
 • घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे .
 • आठवडयातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते.
 • मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे .
 • मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे .
 • लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशे मध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात .
 • घरामध्ये पैसा, संपत्ती , ऐश्वर्य टिकवून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे .
 • घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे .
 • ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात .
 • नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा .
 • मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि   गणपती अथर्वशीर्ष मुलांनी रोज म्हणावे .
 • उत्तम  वैवाहिक आयुष्यासाठी नवरा- बायकोंनी दोन जोडलेल्या बेड वर झोपू नये .
 • नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे .
 • आरोग्यदायी जीवनासाठी घरा मध्ये पिवळा , काळा , लाल हे रंग कोठेही येऊ देवू नये .
 • घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोअरिंग , विहीर पाण्याची टाकी बांधु नये .
 • दक्षिणेला पाय करून झोपु नये कारण आरोग्य, पैसा व मानसिक ताण यांची हानी होते .
 • घराच्या मुख्य दरवाजा जवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते .
 • घराच्या मुख्य दरवाजा समोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक ,शारीरिक व मानसिक हानी होते .
 • हिंस्र पशु पक्षांची, जंगली जनावरांची तोंडे , घरामध्ये लावु नयेत .
 • घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवु नयेत .
 • उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरू नयेत .
 • उत्तम प्रगती साठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी .
 • कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे.
 • घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतींवर लावु नयेत .
 • घरामध्ये कोठेही लाल ,मरून ,काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत .
 • घराच्या मुख्य दरवाजावरती भयानक चित्रे  लिंबु, , मिरची ,राक्षसाची तोंडे असे चित्र लावू नयेत .
 • घरामध्ये अश्रु  ढाळणारया स्त्रियांची ,पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावु नयेत.
 • घराच्या मुख्य दरवाजावरती सुकलेली फुले , वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवु नयेत .
 • घराचा मुख्य दरवाजा पुर्ण उघडणे महत्वाचे आहे  म्हणजेच  मुख्य दरवाजाच्या आत आणि बाहेर कोणताही अडथळा ठेऊ नये .
 • घरामध्ये सुख -समृद्धी मिळावी यासाठी सकाळ-संध्याकाळ धुप, अगरबत्ती, निरंजन लावणे महत्वाचे आहे .
 • घरामध्ये सुख -समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे , भांडणे टाळावीत .
 • मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी त्यांची बेडरूम ईशान्य, उत्तर किंवा वायव्येला   असावी.
 • मुलांचे स्टडी टेबल पुर्व आणि ईशान्य दिशेमध्ये असावेत .
 • मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी स्टडी टेबलचा आकार आयताकृती चौकोनी असावा गोलाकार नसावा .
 • मुलांच्या बेडवरती किंवा स्टडी टेबलवरती कपाट असु नये .
 • आपल्या घराचे पार्कींग कोणत्याही दिशेस असो परंतु पार्कींगमध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावावी .
 • नवीन कार घेताना लाल ,काळा व मरून कलर या रंगाची कार घेणे टाळावे .
 • नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटसच्या अंकांमध्ये चार व आठ हे अंक येऊ देऊ नये .
 • नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटमधील अंकांची बेरीज तीन ,सहा ,नऊ अशी असावी अंकांची टोटल चार व आठ नसावी .
 • कार प्रोटेक्शनसाठी कारच्या डिक्कीमध्ये खडे मीठ कापडी पिशवी मध्ये भरून ठेवावे .
 • घराच्या आग्नेय दिशेला टॉयलेट पाण्याचे बेसिंग येऊ देऊ नये .
 • घर बांधताना ईशान्य दिशेला जिना येऊ देऊ नये .
 • घराची उत्तर दिशा बंद असेल तर हेल्थ आणि वेल्थ प्रोब्लेम येऊ शकतात .
 • घरामध्ये देवांचे फोटो भिंतींवर टांगुन ठेऊ नये त्यांचे पावित्र्य भंग होते .
 • घरातल्या कर्त्या व्यक्तिने वायव्य दिशेला झोपु नये .
 • घरामध्ये कोठेही फॉल सिलिंग करु नये घराची उंची कमी होते त्यामुळे घरातील अडचणी वाढु शकतात.
 • इन्वरटर , यु . पी . एस बॅटरी घराच्या आग्नेय दिशेला असावा .
 • ऑफिस मधले टेबल आयताकृती किंवा चौकोनी असावेत गोलाकार नसावेत .
 • ऑफिस विकत घेताना ऑफिसचा दरवाजा उत्तर , पूर्व किंवा ईशान्येचा असावा .
 • व्यवसाय  करणाऱ्या  प्रत्येक व्यक्तिने  उत्तर दिशेला तोंड करून बसावे .
 • ऑफिस मधील खिडक्या उत्तर आणि पुर्वे दिशेला असतील तर भरपुर प्रगती होते .
 • व्यावसायिकाने झोपताना उत्तरेला पाय करून झोपावे म्हणजे व्यवसायात लाभ भरपुर होतो .
 • ऑफिसमध्ये अकाउंट  डिपार्टमेंट उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे .
 • ऑफिसमध्ये लाल ,काळा ,मरून हा रंग वापरु नये .
 • ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे आणि जागा सुद्धा रिकामी ठेवावी .
 • ऑफिसच्या आजुबाजूच्या परिसरामध्ये खड्डा ,चढ-उतार ,उंच वाढणारी  झाडी अशा गोष्टी येऊ देऊ नयेत .
 • ऑफिसमध्ये खुप मोठे देवघर ठेवु नये देवाचा छोटासा फोटो ठेवावा .
 • ऑफिसमध्ये इन्वरटर , यु . पी . एस बॅटरी आग्नेय दिशेला असावेत.
 • ऑफिसमध्ये टॉयलेट हे वायव्य दिशेला असावे.
 • देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे .
 • घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पुजा करताना आपले तोंड पुर्वे दिशेला करावे .
 • गणपती बाप्पाची मुर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पुजा करताना आपले तोंड पुर्वे दिशेला करावे .
 • देवघरामध्ये एका देवाच्या दोन किंवा तीन मुर्ती कधीही ठेवु नये प्रत्येक देवाची एक मुर्ती ठेवावी .
 • देवघरामध्ये उदबत्ती ,निरंजन आणि समई देवघराच्या आग्नेयेला ठेवावी .
 • सुख - समृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावी .
 • दक्षिण दिशेचा वाईट  प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची उंच झाडे लावावीत.
 • घरामध्ये जाळ्या-जळमटे कोळ्यांची घरटी लागु देऊ नये जाळ्या जळमटे मध्ये राहु केतु या पाप ग्रहांचे अस्तित्व असते .
 • झुरळे ,मुंग्या ,ढेकुण ,पाली हे घरात होणे म्हणजे अशुभाचे संकेत आहेत वेळच्या वेळी पेस्ट कंट्रोल करावे .
 • खराब झालेल्या वस्तु शिळे अन्न ,भुरा लागलेले खाद्य पदार्थ यांचा संग्रह करू नये यामुळे  घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते .
 • शुभलक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती स्वास्तिक आणि घराच्या आतुन बाहेरून गणपतीची टाईल्स लावावी.
 • घराचा उंबरा काळ्या कडाप्याचा लावू नये लाकडी सागवानी असावा
 • घराचा उंबरा पांढरे मार्बल ,प्लायवुड किंवा जंगली लाकडापासून बनवलेला नसावा
 • घराच्या मुख्य दरवाजातील पायपुसणी हिरव्या, निळ्या, पिवळ्या, क्रिम कलरची असावी.
 • घराच्या मुख्य दरवाजातील पायपुसणी लाल ,काळ्या ,मरून रंगाची नसावी.
 • सेफ्टी डोअरचा कलर काळ्या रंगाचा असु नये क्रिम, ऐवरी या रंगाचे सेफ्टी डोअर हवेत.
 • घराची डोअर बेल ही पालीचा चूक-चूक आवाज करणारी बसु नये हे अशुभ आहे.
 • घराची डोअर बेल ही घंटेचा आवाज करणारी असावी हे शुभ असते.
 • घराची डोअर बेल कोणत्याही मंत्राची किंवा आरतीची नसावी या अपुर्ण वाजल्यामुळे या मंत्र सामर्थ्याचा घराला काही उपयोग होत नाही.
 • सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजांना महिन्यातून एकदा ऑईलिंग करून घ्यावे दरवाजातून कर-कर आवाज येणे हे अशुभ लक्षण आहे.
 • घरामध्ये स्वयंपाक घर किंवा इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकनार याची काळजी घ्यावी पाणी टपकने अशुभ मानले जाते.
 • घरामध्ये किंवा घराच्या बाहेर चप्पल ,शुज कधी पालथ्या पडु देऊ नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढून त्रास होऊ शकतो.
 • घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा असु नये कारण मुख्य दरवाजातून चांगली उर्जा बाहेर परावर्तित होते.
 • विंड चाइमचा (पवन घंटी) मधुर आवाज मनाला शांती देतो दु:ख दुर करतो संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो.
 • विंड चाइम (पवन घंटी) ही सहा पाईपची घराच्या वायव्य दिशेला लावावी.
 • नवीन जागी मन रमत नसेल किंवा कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घराला रंग रंगोटी करावी, घरातील अडगळ भंगार काढून टाकावीत.
 • फिश पॉट घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवावा.
 • मुलांच्या स्टडी टेबल च्या समोर लक्ष विचलित करणार पोस्टर किंवा चित्र लावु नये त्याऐवजी अभ्यासाचा चार्ट पेपर किंवा टाईम टेबल लावावे.
 • घरामध्ये सुकलेली फुले ,पाने ,झाडे ठेवु नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • हसरा हॅप्पी मॅन घरात असेल तर हे सकारात्मक दृष्टिकोन उत्साह व आनंदी जीवनाचे प्रतिक मानले जाते हे प्रतिक घरात ठेवल्यामुळे दु:ख दुर होऊन आनंदी राहण्यासाठी प्रेरणा मिळते.
 • हसरा हॅप्पी मॅन घराच्या मुख्य दरवाजा समोर तोंड करून ठेवावे.
 • देवावर वाहिलेली फुले , हार म्हणजेच निर्माल्य घरामध्ये ठेवणे चांगले नसते लगेचच त्याचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे.
 • देवी - देवतांच्या मुर्ती किंवा फोटो भितींवर शो -पीस प्रमाणे लावु नये त्यांचे पावित्र्य भंग होते.
 • मुख्य प्रवेशद्वाराकडे पाय करून झोपू नये त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या लक्ष्मीचा अपमान होतो.
 • घरातील महत्वाची पुस्तके, कागदपत्रे पुर्व दिशेला असलेल्या कपाटात ठेवावीत.
 • नवीन घर घेताना बिल्डिंग आणि स्किमच्या प्लॉट चा एंटरन्स उत्तर आणि पुर्वेचा असावा.
 • घरामध्ये पैसे टिकुन रहावे सुख - समृद्धी लाभावी यासाठी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गजलक्ष्मी घरामध्ये उत्तरेला तोंड करून स्थापन करावी.
 • वास्तु पुरुष हा वास्तुशांती केल्यावर घराच्या आग्नेय दिशेला स्थापन करावा.
 • वास्तुशांती झाल्यानंतर वास्तु पुरुष सोन्याचा स्थापन करावा.
 • घरामध्ये झाडु दरवाजाच्या मागे ठेवावा समोर दिसेल असा ठेवु नये.
 • घराच्या मुख्य दरवाजा समोर ओळीने तीन किंवा दोन दरवाजे नसावेत.
 • ब्रम्हस्थळाच्या मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागतो.
 • घरामध्ये तुटलेली, फुटलेली चिर पडलेली भांडी ठेवू नयेत.
 • घराच्या आग्नेय दिशेला नळ किंवा पाण्याची टाकी येऊ देऊ नये त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही.
 • कार किंवा टु - व्हिलर पार्क करताना उत्तर आणि पुर्व दिशेला तोंड करून पार्क करावी.
 • कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर काळे, निळे, लाल, मरून या डार्क रंगाचे नसावेत.
 • कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर व्हाईट, हाफ व्हाईट, ऐवरी, क्रिम या रंगाचे असावेत.
 • घराच्या खिडक्या पुर्व आणि उत्तर दिशेला असाव्यात म्हणजे सुर्य प्रकाश जास्तीत जास्त घरामध्ये येतो.
 • दिवाळीचे सहा दिवस लक्ष्मी आगमनाचे , लक्ष्मी पुजनाचे आणि लक्ष्मीला फिरता देणारे असतात त्यामुळे घरामध्ये आनंददायी वातावरण ठेवावे भांडणे वादविवाद, नकारात्मक बोलणे टाळावे.
 • दिवाळीचे सहा दिवस शुभ-पुण्य काल लक्ष्मीदायक असतो. लक्ष्मीचा वरद हस्त कायमस्वरूपी घरावरती रहावा यासाठी या कालावधीमध्ये अशुभ कृत्य, अशुभ वर्तन टाळावे.
 • दिवाळीमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर सुंदर रांगोळी काढावी.
 • लक्ष्मी पुजनासाठी श्री यंत्र, लक्ष्मीचा फोटो, टाक, नाणी, सोने, चांदी, गजलक्ष्मी आणि कुबेर मुर्ती असे ठेवावे.
 • घराला रंग रंगोटी करताना घराच्या दक्षिण व पश्चिम भिंतीला डार्क रंग संगती करू शकता.
 • महिन्यातुन एक ते दोन वेळा घरामध्ये गोमुत्र सिंचन करावे.
 • घरातील देवघर बाथरूम किंवा टॉयलेटच्या बाजुला ठेवु नये.
 • हॉल, किचनमध्ये बांबु - ट्री लावल्याने तेथील नकारात्मक उर्जा कमी होते.
 • घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा कलश ठेवावा त्यामुळे घरामध्ये सुख - समृद्धी येते.
 • बेडरूमच्या बाहेरील भिंतींवर चिरा पडु देऊ नयेत यामुळे घरामधील अडचणी वाढु शकतात.
 • घरातील समोरच्या भागात, बालकनीमध्ये काटेरी किंवा टोकदार पानाचे रोप लावु नये हे रोप नकारात्मक उर्जा प्रदान करते.
 • घरामध्ये तुटलेल्या मुर्तीचे विसर्जन करावे, विसर्जनाच्या आगोदर विधिवत पुजा करून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे.
 • वास्तुनुसार प्रवेशद्वार सदैव घराच्या आत उघडणारे हवे मुख्यद्वार दोन भागांमध्ये विभागणारे नसावेत.
 • आपल्या आवडीची सुगंधित फुले नेहमी आपल्या बेडरूममध्ये वायव्येला ठेवावीत.
 • मेडिकल शॉप हे दक्षिण मुखी असु नये.
 • औषध - गोळ्या नेहमी ईशान्य दिशेला ठेवाव्यात.
 • औषध घेताना तोंड उत्तर अथवा पुर्व दिशेला करायला पाहिजे.
 • घरामध्ये पाणी पिताना आपले तोंड उत्तर अथवा पुर्व दिशेला करावे.
 • घरामध्ये जेवताना आपले तोंड उत्तर अथवा पुर्व दिशेला करावे.
 • देव - देवतांच्या मुर्ती शोकेसमध्ये ठेवु नयेत.
 • घराचे प्रवेशद्वार नेहमी आकर्षक ठेवा. दारामध्ये नेहमी प्रकाश राहील याची काळजी घ्या यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते.
 • घरामध्ये जास्त दिवस तुटलेल्या वस्तु, कचरा साठवुन ठेवु नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • घरामध्ये तुटलेली फ्रेम, आरसे असतील तर ते घरामधुन काढुन टाकावेत यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • नवीन फर्निचर करताना फर्निचरला काळा, मरून, रेड, डार्क ब्लु हे रंग वापरू नयेत.
 • घरामध्ये नवीन फर्निचर करताना बेड समोर कपाटांचे, फर्निचरचे टोकेरी कॉर्नर येऊ देवु नये.
 • घरामध्ये नवीन फर्निचर करताना कपाट, तिजोरी उत्तरेला अथवा पुर्वेला तोंड करून ठेवावी.
 • लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्वशीर्ष वाचावे.
 • सर्व ग्रह दोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळविण्यासाठी आपण हनुमान चालिसा वाचणे आवश्यक आहे.
 • घरामध्ये सुख - समृद्धी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना, वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावे.
 • वैवाहिक जीवनात सुख - शांती राहण्यासाठी दोन जोडलेल्या बेड वर नवरा बायकोनी झोपु नये.
 • घरामध्ये गंजलेले, तुटलेले दरवाजे नसावेत त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचा घरावर वाईट परिणाम होतो.
 • घरामध्ये पाण्याचा सप्लाय उत्तर-पुर्व दिशेकडुन करावा.
 • घरामध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तु खराब किंवा तुटलेली असेल तर अशी वस्तु घरामधून काढुन टाकावी त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • घरातील पंखे, कुलर यांचा आवाज येत असेल तर दुरूस्त करून घ्यावेत यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • घरामध्ये झाडू उभा किंवा पाय लागेल असा ठेवु नये.
 • देवघरामध्ये खिडकी व दरवाजे उत्तर-पुर्व दिशेमध्ये असाव्यात.
 • वास्तु मध्ये सुख, शांती, समृद्धी कायम टिकुन रहावी यासाठी दरवर्षी पुजा - पाठ, वास्तुशांत, होम हवन यासारखे धार्मिक विधी नेहमी करणे गरजेचे आहे.
 • नवीन घर विकत घेतल्यानंतर फक्त गृह प्रवेश न करता विधिवत योग्य शुभ - मुहुर्ताला वास्तुशांत करून रहायला जावे म्हणजे वास्तु लवकरात लवकर लाभते.
 • ग्रह बल वाढविण्यासाठी योग्य वास्तु तज्ञाकडुन आपल्या घराची व्हिजिट करून घेणे आणि योग्य ज्योतिषाकडून पत्रिका दाखवुन ग्रह दोष निवारण करून घेणे.
 • यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिक जीवन शैली, सदवर्तन, नम्रपणा, दानशुरता, संयमी वृत्ती या पाच गोष्टींचा भरपुर उपयोग होतो.
 • मुख्य दरवाजाच्या पाठीमागे कपड्यांचे रॅक किंवा किल्ल्यांचे रॅक लावुन ठेवु नये.
 • घराच्या मुख्य दरवाजासमोर घरातील कोणत्याही व्यक्तिचा किंवा फॅमिली चा ग्रुप फोटो लावु नये.
 • घरातील फॅमिली फोटो हा दक्षिण किंवा पश्चिम भिंतींवर लावावा म्हणजेच दक्षिण भिंतीवर उत्तरेला तोंड करून आणि पश्चिम भिंतींवर पुर्वेला तोंड करून लावावा.
 • घरातील कुटुंबांच्या सुख - समृद्धी साठी फॅमिली चा एकत्रित फोटो दक्षिण, पश्चिम भिंतींवर लावावा.
 • घरामध्ये सुख - समृद्धी साठी घरातील खोल्यांना वेगवेगळा रंग देवु नये.
 • बेडच्या समोर आरसा किंवा प्रतिबिंब पडेल अशी कोणतीही वस्तु ठेवु नये.
 • बेडरूम मध्ये वाहता धबधबा किंवा पाण्याचे चित्र लावु नये.
 • घरात हॉल अथवा बेडरूम मध्ये कोठेही बुडत्या जहाजांचे, हेलकावे खाणाऱ्या बोटीचे चित्र लावु नये.
 • घरात हॉल अथवा बेडरूम मध्ये आदिवासी रडक्या, अश्रु वाहणाऱ्या, नैराश्य दाखवणाऱ्या अशा कोणत्याही स्त्री-पुरुषांची चित्र लावु नयेत.
 • कोणत्याही बेडरूम मध्ये बेडच्या वरती लटकते झुंबर किंवा लॅम्प येऊ देवु नये.
 • घरात बेडरूम मध्ये दक्षिण भिंतीला आरसा येऊ देवु नये.
 • मास्टर बेडरूम मध्ये एकट्या स्त्री, दु:खी, रडलेल्या स्त्रीचे चित्र लावु नये हसती-खेळती चित्र लावावीत.
 • घरामध्ये डार्क पिवळा रंग देऊ नये, हा रंग पोटाचे आजार वाढविणारा असतो.
 • घरामध्ये भिंतीला लाल भडक रंग देऊ नये यामुळे घरात चिड - चिड वादविवाद भांडणे आणि उष्णते संबंधी विकार होऊ शकतात.
 • घरामध्ये डार्क गुलाबी, बेबी पिंक असे कलर देऊ नये यामुळे ढेकुण, कृमी किटक, जाळ्या जळमटे, कोळ्याची घरटी असे लागतात.
 • घरात सिलिंगला फक्त व्हाईट कलर दयावा, कोणतेही डार्क रंग देवु नये त्यामुळे आकाश तत्त्व बिघडते.
 • घराच्या नॉर्थ आणि ईस्ट भिंतीला डार्क रंग किंवा अवजड फर्निचर ठेऊ नये.
 • सेफ्टी डोअर किंवा मुख्य महाद्वार यांना काळा, लाल किंवा मरून कलर देवु नये. ऐवरी किंवा चॉकलेटी कलर दयावा.
 • नॉर्थ - ईस्ट या भिंतीवरती अवजड पेंटिंग, झुंबर, फोटो, कपाटे किंवा धान्याच्या कोठया ठेवु नयेत.
 • मन:शांती आणि घरातील प्रगतीसाठी प्रत्येक रूमची ईशान्य दिशा मोकळी ठेवावी.
 • घरामध्ये ईस्त्री, शिवणकाम, भाजी कापणे, मुलांचा अभ्यास घेणे किंवा कॉमप्युटर वर काम करणे ही शुभ कामे पुर्व दिशेला तोंड करून करावीत.
 • घरातुन व्यवसाय करत असाल तर उत्तरेला तोंड करून टेबल अथवा कॉमप्युटर ठेवावा.
 • रिसेलचे घर घेतल्यानंतर देखील आपल्याला घरामध्ये वास्तुशांत करणे गरजेचे आहे.
 • घराच्या उत्तर, ईशान्य, वायव्य दिशेला शेगडी, ओव्हन अशी अग्नी तत्त्वाची कोणतीही गोष्ट येऊ देवु नये यामुळे धन हानी, आर्थिक हानी होते.
 • घोडयाची नाल घराच्या मुख्य दरवाजावर उलटी टांगावी ,पायात किंवा उंबऱ्यावर लावु नये.
 • देवघरामध्ये लाल किंवा कोणत्याही रंगाचा बल्ब लावु नये यामुळे देवतत्वाचे तेज आपल्याला मिळत नाही.
 • कोणताही व्यवहार करताना बिझनेस अथवा शिक्षण असो काळ्या रंगाचे पेन वापरू नयेत.
 • भाग्योदयासाठी व्हाईट बिग डाइल चे घड्याळ हातामध्ये वापरावे.
 • घरामध्ये नकारात्मक बोलणे, शिव्या - शाप देणे हे टाळावे. कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तु म्हणत असतो. वाईट बोलाल तेही तथास्तु होईल आणि चांगले बोलाल तेही तथास्तु होईल.
 • कंपनीमध्ये असलेली स्टेशनरी, व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड किंवा कंपनीच्या नावे असलेला बोर्ड हे काळ्या रंगाचे असु नयेत, ग्रीन किंवा ब्लु रंगाचे असावेत.
 • ऑफिस मधील वर्किंग टेबल, कॉमप्युटर टेबल, मशिनरी टेबल हे आयताकृती, चौकोनी असावेत गोलाकार नसावेत.
 • ऑफिस मध्ये टी - कॉफी मशिन किंवा पॅन्ट्री हे ऑफिसच्या आग्नेय दिशे मध्ये ठेवावे.
 • ऑफिसची, कारखान्याची किंवा व्यवसायाची जागा नवीन विकत घेतली अथवा नवीन वास्तु बांधली तरीही वास्तुशांत करणे गरजेचे आहे.
 • ऑफिस मधले टेबल खुर्ची, फर्निचर काळ्या किंवा लाल रंगाचे असु नयेत.
 • ऑफिस मधले टेबल, खुर्ची, फर्निचर, कपाटे ब्लु, स्काय ब्लु, ग्रे, ग्रीन, पिस्ता, ब्राऊन रंगाचे असावेत.
 • ऑफिसच्या मेन एन्टरन्स पासुन सहा फुटाच्या अंतरावरती सोफा, टेबल, खुर्ची असा कोणताही अडथळा येऊ देवु नये.
 • नवीन घर विकत घेताना, बुकिंग करताना, गृह प्रवेश करताना पंचांगानुसार शुभ वेळ, शुभ दिवस, योग्य तिथीवार पाहुन घ्यावा.
 • नवीन घर विकत घेताना साउथ - वेस्ट ईन्ट्री असणारे घर विकत घेऊ नये यामुळे धनहानी होते.
 • नवीन घर विकत घेताना आग्नेय दिशेचा एन्टरन्स असणारे घर विकत घेऊ नये त्यामुळे आरोग्य हानी, धन हानी, चिड - चिड अशा गोष्टी घरामध्ये होतात.
 • दक्षिणेचा एन्टरन्स असणारे घर विकत घेऊ नये त्यामुळे पैसे टिकत नाही, फायनानशियल प्रोब्लेम येतात, कोर्ट कचेऱ्या पाठीमागे लागतात.
 • घराच्या दक्षिण - पश्चिमेला खड्डा किंवा उतार असु नये किंवा करू नये यामुळे वास्तु मध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते.
 • घराच्या उत्तर दिशेला जड कपाटे, धान्याची पोती भरपुर वजन असणारे सामान किंवा जडत्व व अग्नितत्वा संबंधीत कोणत्याही गोष्टी ठेवु नये.
 • घराच्या मुख्य दरवाजा समोर देवघर ठेवु नये त्यामुळे देवाचे पावित्र्य भंग होते आणि पुजा केल्याची फल प्राप्ती मिळत नाही.
 • घराच्या मुख्य दरवाजा समोर किचन किंवा डायनिंग टेबल येऊ देवु नये.
 • घराच्या मुख्य दरवाजाच्या आत किंवा बाहेर खांब, भिंत, उंच झाड, तुळशी वृंदावन अशा कोणत्याही गोष्टी ठेवु नयेत.
 • घरामध्ये भितींवर असलेल्या घड्याळ्याचे टोल किंवा काटे बंद पडु देवु नये नेहमी अखंड चालु ठेवावे.
 • हातात घातलेल्या घड्याळाची डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी.
 • भाग्यवृद्धी साठी घराच्या उत्तर किंवा पुर्व दिशेच्या भिंतीवरती म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावावे.
 • घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवितो म्हणुन घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवु नये.
 • घराच्या किचन ओटयाच्या खाली साफ - सफाई ठेवावी अडगळ भंगार ठेवु नये त्यामुळे घरातील स्त्री ची चिड - चिड वाढते आणि मानसिकता बिघडते.
 • घराच्या किचन ओटयाच्या खाली, सिंक खाली खडे मिठाचा बाऊल ठेवावा.
 • स्वयंपाक घरात शेगडी उत्तर भिंतीला लागुन ठेवु नये.
 • स्वयंपाक घर शक्यतो आग्नेय किंवा वाय़व्येला उत्तराभिमुख ठेवावे.
 • दक्षिण दिशेला तोंड करून स्वयंपाक करू नये स्वयंपाक करताना तोंड उत्तर किंवा पुर्व दिशेला करावे.
 • स्वयंपाक घरात फ्रिज वरती बांबु ट्री ठेवावा म्हणजे किचन मधील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते.
 • किचन मध्ये लाल, मरून असे कोणतेही डार्क रंग वापरू नयेत, हिरवा, पिस्ता असे रंग वापरावेत.
 • किचन मध्ये गॅसच्या समोर बाथरूम किंवा देवघर येऊ देवु नये.
 • किचन मध्ये भिंतीना ऑफ व्हाईट, ऐवरी, पिस्ता कलर द्यावा.
 • किचनमध्ये उतरते फॉल सिलिंग करू नये.
 • किचन वरती किंवा खाली ओल, लिकेज असु नये आणि किचन मध्ये गळके नळ नसावेत.
 • किचन ओट्याला काळा कडप्पा वापरू नये ग्रीन ग्रेनाईट वापरावे.
 • किचन मध्ये स्वयंपाक करताना अल्हादायक वातावरण असावे, आनंदी, उत्साही वातावरण असेल अशी किचनची रचना असावी.
 • किचन मध्ये किचन ओट्यावरती कोणत्याही देवाचे फोटो अथवा तसबीरी मुर्त्या लावु नयेत.
 • किचन ओट्यावरती गॅस आणि पाण्याचे सिंग जवळ येऊ देवु नये आणि गॅस शेजारी पाण्याचे हंडे ठेवु नयेत.
 • घराच्या मुख्य दरवाजा समोर अंगनात किंवा आजु - बाजूला खड्डे पडलेले असु नयेत हे दुर्भाग्याचे लक्षणे आहे.
 • किचन ओट्याच्या पाठीमागे आरसा किंवा काचेचे कपाट असु नये.
 • किचन ओटा, किचन ओट्यावरची टाईल्स, जमिनीवरील फरशी खडे मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावी त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
 • वास्तु शांत झाल्यानंतर किचन मध्ये घराच्या आग्नेय दिशेला जमिनी मध्ये वास्तु - पुरुषाची स्थापना करावी.
 • किचन मध्ये ट्रॉली चा रंग लाल, मरून, काळा, डार्क चॉकलेटी असु नयेत आणि कपाटे, क्रॉकरी यांचाही रंग डार्क नसावेत.
 • किचन मध्ये डायनिंग टेबल पुर्व-पश्चिम असा ठेवावा दक्षिण दिशेला जास्त खुर्च्या येऊ देवु नये.
 • किचन मध्ये पाण्याचे सिंक उत्तर - पुर्व दिशेमध्ये असावे.
 • किचन मध्ये किचन ओट्यावरती खिडकी किंवा फॅन असणे गरजेचे आहे त्यामुळे प्रदुषण होत नाही.
 • हॉल मध्ये टि. व्ही हा उत्तर किंवा पुर्व भिंतीवर लावावा त्यामुळे बसणाऱ्याचे तोंड उत्तर - पुर्व या शुभ दिशांना होते.
 • हॉल मध्ये घर मालकाच्या उंचीपेक्षा जास्त फार्निचर, पुतळे, फोटो फ्रेम, शोभेची झाडे किंवा कपाटे ठेवु नयेत.
 • हॉलचा रंग लाल, काळा, मरुन, गुलाबी असा असु नये, हॉल मध्ये रंग संगती हलक्या रंगाची असावीत डार्क रंग कोठेही देवु नयेत.
 • हॉल मध्ये काळा, लाल, मरून रंगाचा सोफा, खुर्ची, टेबल ठेवु नयेत.
 • हॉल च्या भिंतींवर ढाली, तलवारी, बंदुका यांची प्रतिके किंवा फोटो सुद्धा लावु नयेत.
 • हॉलमध्ये हातात भाला घेतलेले पुतळे, उधळलेला घोडा, सिंह किंवा वाघाची चित्रे ठेवु नयेत.
 • घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील हॉल मध्ये भरपुर प्रकाश देणारे दिवे लावावेत, हॉल मध्ये अंधार करून ठेवु नये.
 • घराच्या व हॉलच्या उत्तर, पुर्व, ईशान्य या शुभ दिशांमध्ये कोठेही चप्पल, बुट अशा कोणत्याही नकारात्मक गोष्टी ठेवु नयेत.
 • हॉलमध्ये बांबु - ट्री ठेवल्याने तेथील नकारात्मक उर्जा कमी होते.
 • आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी खुला ठेवला पाहिजे. तसेच दरवाज्यासमोर किंवा त्याच्या आसपास पाना-फुलांच्या वेली लावू नये. ते लावल्याने घराचे मुख्यद्वार झाकले जाते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येत नाही.
 • मुख्य दरवाजावरती घोड्याची वापरलेली नाल लावावी आणि ती लावताना त्याची दोन टोके जमिनीकडे होतील अशी लावावी.
 • ज्या दिशेने शुद्ध वायूचा प्रवेश घरात होतो. त्या दिशेत एक्जेस्ट फॅन लावून घेतला पाहिजे.
 • वास्तूनुसार प्रवेशद्वार सदैव आत उघडणारा हवे. मुख्य द्वार जर दोन पल्ल्याचा असेल तर हे फारच उत्तम. प्रवेश द्वारापुढे पायरी, खांब नको.
 • हॉलमधील फार्निचर सोफा, खुर्ची, टेबल, टिपॉय रंग उडालेले, तुटलेले अथवा जिर्न अवस्थेतील नसावे त्यामुळे घरातील शुभ ऊर्जा नाहीशी होते.
 • लक्ष्मीचा किंवा कोणत्याही देवीचा फोटो मुख्य दरवाजाकडे तोंड करून लावु नये.
 • सुख - समृद्धीसाठी व्हाईट क्रिस्टल झुंबर टांगावे झुंबर अतिशय मोठे असु नये हॉलला साजेसे योग्य प्रमाणात असावे.
 • घराच्या उत्तर दिशेला व्हाईट, ऑफ व्हाईट असे हलके रंग दयावेत त्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्यता आणि लक्ष्मी आगमन सोपे होते.
 • शुक्रवारी घरामध्ये श्री यंत्राची स्थापना करावी यामुळे सुख - समृद्धी व धन स्थैर्यता वाढते व कर्जा पासुन मुक्ती होण्यास मदत होते.
 • शनिवारी शुभ - लाभ होण्यासाठी निळ्या रंगाचे वस्र्त्र धारण करावे आणि ओम शनैश्वराय नमः हा जप १०८ वेळा करावा.
 • कोणत्याही शुभ कामासाठी काळ्या रंगाचा वापर करू नये उदाहरणार्थ पेन, पर्स, बॅग, बुट, चप्पल, कपडे.
 • घराच्या उंबऱ्यावर कोणतेही स्टिकर लावु नये त्यापेक्षा रांगोळीने किंवा हळदी - कुंकवाने स्वस्तिक, लक्ष्मीची पद चिन्हे काढावीत.
 • घराच्या मुख्य दरवाजावरती लाल रंगाचा दिवा लावु नये.
 • मुख्य दरवाजाच्या बाहेर पाय पुसणे हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असावे.
 • शु रॅक मुख्य दरवाजाला आडवे येईल असे ठेवु नये.
 • नवीन घर विकत घेताना किंवा बांधताना उत्तर आणि पुर्व दिशेला भरपुर खिडक्या असणे खुप महत्त्वाचे आहे त्यामुळे कायमस्वरूपी घरामध्ये सुख - समृद्धी राहते.
 • घरामध्ये धनवृद्धी साठी घराच्या उत्तरेला किंवा ईशान्येला फिश पॉट किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे.
 • फिश पॉट घराच्या आग्नेय दक्षिण, नैऋत्य किंवा पश्चिम दिशेमध्ये ठेवु नये.
 • घराच्या सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जीवनासाठी फिश पॉट हा लहान आकाराचा ठेवावा खुप मोठा किंवा भव्य उंचीचा ठेवु नये.
 • घराच्या सुख-समृद्धी साठी फिश पॉट मध्ये आठ सोनेरी फिश आणि एक काळी फिश ठेवावी.
 • फिश पॉट हा भिंतीमध्ये कप्पा करून किंवा खोचून ठेवु नये जमिनीला समांतर असा ठेवावा.
 • घराच्या सुख - समृद्धी साठी आणि फायनानशियल पोझिशन स्ट्रॉंग होण्यासाठी वॉटर फॉल घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेमध्ये लावावा.
 • घराच्या उत्तर व ईशान्य दिशेमध्ये फुलांच्या कुंड्या, रोपटी किंवा कोणतेही आर्टिफ़िशियल झाड लावु नये.
 • घराच्या ब्रम्हस्थळामध्ये म्हणजेच घराच्या सेन्टर मध्ये भरपुर मोकळी जागा ठेवावी फ्रिज, कपाटे, किचन, टॉयलेट, कॉलम, बिम हे येऊ देवु नये.
 • ब्रम्हस्थळामध्ये ( घराचा सेन्टर ) असणाऱ्या कोणत्याही वास्तुदोषामुळे घरामध्ये आजारपण, नैराश्य, वाईट विचार, अपयश या गोष्टी वाढीस लागतात त्यामुळे ब्रम्हस्थळामध्ये कोणताही वास्तुदोष येऊ देवु नये.
 • किचन मध्ये ब्रम्हस्थळ ( घराचा सेन्टर ) आल्यास त्यावरती फ्रिज, ओटा, डायनिंग टेबल, देवघर येऊ देवु नये त्यामुळे घरात शुभ ऊर्जा प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण होतो.
 • बंगला, इंडस्ट्री, दुकान, मेडीकल, हॉस्पिटल किंवा कमर्शियल कॉम्पलेक्स बांधताना प्लॉटचे,वास्तुचे ब्रम्हस्थळ नेहमी मोकळे सोडावे.
 • घर बांधताना प्लॉट च्या मध्यभागी म्हणजेच ब्रम्हस्थळा मध्ये विहीर, खड्डा, बोअरिंग, पाण्याची टाकी येऊ देवु नये.
 • नवीन घर विकत घेताना घराचा (सेंटर पॉइंट) ब्रम्हस्थळ हे घराच्या बाहेर जात असेल किंवा टॉयलेट मध्ये येत असेल तर ते घर विकत घेऊ नये.
 • जवळ जवळचे दोन फ्लॅट एकत्र जोडुन एक मोठा फ्लॅट तयार करण्यासाठी वास्तु तज्ञाच्या सल्याने फ्लॅटचे एकत्रीकरण करावे त्यामुळे ब्रम्हस्थळाचा दोष निर्माण होऊ शकतो.
 • शेतीच्या ब्रम्हस्थळात विहीर, खड्डा, शेत तळे असल्यास मालकाला नुकसान संभवते.
 • घराच्या छपराचा उतार उत्तर किंवा पुर्वेला असावा, दक्षिण - पश्चिमेला उतार असल्यास हानिकारक असते.
 • घराच्या उत्तर, पुर्व दिशेमध्ये असलेले टेरेस शुभ असते, दक्षिण किंवा पश्चिमेला असलेले टेरेस हानिकारक असते.
 • टेरेस वर सोलर पॅनल घराच्या आग्नेय किंवा दक्षिण दिशेला लावावे. ईशान्य - उत्तरेमध्ये सोलर पॅनल लावु नये.
 • घरामध्ये जिना हा गोलाकार नसावा आयताकृती, चौकोनी आकाराचा आणि पायरी चढताना उजवीकडे वळणारा असावा.
 • वास्तुशास्त्रा नुसार घर असणे किंवा करून घेणे म्हणजेच आपल्या कुटुंबियांना भक्कम सुरक्षा कवच प्रदान करण्यासारखे आहे त्यामुळे योग्य वास्तुतज्ञाकडून व्हिझिट करून घेणे महत्वाचे आहे.
 • कोणतेही शुभ काम करताना काळ्या रंगाचा वापर कमी करावा उदाहरणार्थ - कपडे, बॅग, पेन, चप्पल.
 • घरामध्ये तुटलेली फरशी, तुटलेले फर्निचर अशा वस्तु घरामध्ये असतील तर त्यामध्ये त्वरित बदल करून घ्यावा त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • बेडरूममध्ये बेड हा शक्यतो लाकडी सागवानी असावा लोखंडी असेल तर त्याला लाकडी अथवा रबरी गट्टु बसवुन घ्यावेत त्यामुळे हेल्थ प्रोब्लेम कमी होतात.
 • बेडच्या खाली नऊ मोर पिस ठेवावीत त्यामुळे शांत झोप लागते आणि आजुबाजूच्या वातावरणातील वाईट प्रभाव कमी होऊन आरोग्य सुधारते.
 • मास्टर बेडरूम च्या गादी खाली बँकांचे पासबुक, कोर्टाच्या नोटीसा, फाईल आणि कोणतेही नकारात्मक कागद पत्रे ठेवु नये.
 • भोजन करताना घराच्या उत्तर किंवा पुर्व दिशेला तोंड करून भोजन करावे दक्षिण किंवा पश्चिमेला तोंड करू नये.
 • डायनिंग टेबल किचनच्या उत्तर किंवा पुर्व दिशेमध्ये असावा पश्चिम किंवा दक्षिण दिशेमध्ये डायनिंग टेबल ठेवु नये.
 • नवीन घर किंवा कमर्शियल कॉम्पलेक्स बांधताना घराच्या दक्षिण व पश्चिमेला मोकळी जागा सोडुन बांधकाम करू नये उत्तर - पुर्व या शुभ दिशांना मोकळी जागा सोडुन बांधकाम करावे.
 • वास्तु मध्ये पूजा, होम - हवन, सत्यनारायण करताना आपले तोंड उत्तर - पुर्व या शुभ दिशांना करावे त्यामुळे चांगली फल प्राप्ती मिळते.
 • घराच्या आग्नेय दिशेला कोठेही पाण्याचे पिंप, हांडे अशा कोणत्याही गोष्टी ठेवु नयेत.
 • आग्नेय दिशेमध्ये वॉटर स्टोरेज, अंडर ग्राउंड पाण्याची टाकी, बोअरिंग, विहिर येऊ देवु नये.
 • घरामध्ये उत्तम सुख समृद्धी, लक्ष्मी आगमन आणि आर्थिक भरभराट होण्यासाठी मुख्य दरवाजा समोर दोन हत्ती ठेवावेत.
 • घरामध्ये सुख समृद्धी साठी घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेला कासव ठेवावा.
 • देवघरामध्ये उदबत्ती, निरंजन, कापुर आग्नेय दिशेमध्ये लावावे.
 • दुकान, फॅक्टरी, कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी.
 • स्वतःच्या मालकीचे कोणतेही वाहन( कार, ट्रक, टु - व्हिलर )मोठ्या प्रवासावरून आल्यावर गाडीच्या चाकांवरती गोमुत्र शिंपडावे आणि महिन्यातुन एकदा खडे मिठाच्या पाण्याने गाडी स्वच्छ करावी.
 • नवीन घर बांधताना टेरेसवर पाण्याची टाकी घराच्या नैऋत्य दिशेला उंचावरती ठेवावी आग्नेय - ईशान्येला ठेवु नये.
 • ॉयलेटची टाकी ईशान्य, मध्य - पुर्व, आग्नेय, ब्रम्ह्स्थळ आणि नैऋत्य दिशेमध्ये येऊ देवु नये.
 • घराच्या टेरसवरती तुटलेल्या कुंड्या, जुने फ़र्निचर, बंद पडलेल्या सायकली अशा कोणत्याही नकारात्मक गोष्टी ठेवु नयेत.
 • घराच्या आसपास बाभळीचे किंवा कोणतेही काटेरी वृक्ष नसावे.
 • घराच्या आजुबाजुला चिक येणारे किंवा ज्या झाडाला दुध येते असे कोणतेही झाड लावु नये.
 • कोणत्याही काटेरी वृक्षाची सावली घरावर पडू देवु नये.
 • नवीन घर विकत घेताना शक्यतो रोड जवळचे म्हणजेच रहदारीचे हायवे, भरपुर ट्रॉफिक असणारे रस्ते, मोठे रेल्वे स्टेशन यांच्या जवळचे घर विकत घेणे टाळावे त्यामुळे गोंगाट निर्माण होऊन मन शांती बिघडते
 • धन स्थेर्यतेसाठी घरामध्ये होम हवन, सत्यनारायण पुजा, उदक पुजा, दान - धर्म, जप अशा गोष्टी नेहमी करत रहाव्यात.
 • कंपनी, फार्म हाउस, शेती साठी जमिनी विकत घेताना उत्तर किंवा पुर्व दिशेला डोंगर किंवा उंच टेकडी असेल तर अशी जमीन विकत घेवु नये , डोंगर दक्षिण पश्चिमेला असेल तर ती जमीन शुभ असते.
 • आर्थिक प्रगती चांगली होण्यसाठी घराच्या उत्तर दिशेला रेड, मरून असे कोणतेही डार्क रंग देवु नये व्हाईट, ऑफ व्हाईट, क्रीम असे रंग दयावेत.
 • उत्तरेला जड कपाट, शो-केस, बेड, किचन अशा गोष्टी आल्यास आर्थिक प्रगती होत नाही त्यासाठी उत्तर दिशा हलकी, मोकळी आणि कोणतेही वजन नसणारी असावी.
 • ईशान्य दिशेमध्ये बाथरूम किंवा स्टोरेज ची खोली नसावी त्यामुळे आरोग्यहानी,धनहानी आणि सर्व प्रकारे नुकसान होते.
 • ईशान्येच्या दोष निवारणासाठी सुंदर आकर्षक कारंजे ठेवावे किंवा पांढऱ्या संगमरवरी बाऊल मध्ये पाणी भरून ठेवावे यामुळे ईशान्य दिशेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • मुख्य दरवाजाच्या डाव्या किंवा उजव्या बाजुला बांबु - ट्री किंवा तुळस कुंडी मध्ये लावल्याने घरामध्ये सुख – समृद्धी व फायनानशियल प्रगती होते.
 • ऑफिस किंवा दुकानामध्ये कायम स्वरूपी म्युझिक सिस्टीम बसवुन घ्यावे आणि रोज कामाच्या वेळे मध्ये एफ.एम चालु असावे यामुळे ऑफिस मधील कर्मचारी वर्गांना काम करण्यास उत्साह येतो व कामा वरती लक्ष केंद्रीत होते आणि त्यामुळे कंपनीची भरभराट होते.
 • स्वयंपाक करताना किचन मध्ये म्युझिक सिस्टीम, एफ.एम सतत चालु ठेवावे यामुळे स्वयंपाक करताना चैतन्य दायी वातावरण निर्माण होऊन आपले अन्न पौष्टिक व सात्विक होते त्यामुळे आरोग्य उत्तम रहाते.
 • सकाळच्या वेळेमध्ये गायत्री मंत्र, श्री सुक्त, पुरुष सुक्त, आरत्या यांची सी.डी घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • घराची रचना करताना घरात आलेल्या व्यक्तीला देवघर, किचन, बेडरूम, तिजोरी न दिसेल अशा पद्धतीने घराची रचना करावी.
 • प्लॉट च्या उत्तर किंवा पुर्व दिशेला डोंगर, इमारत किंवा कोणतेही उंच बांधकाम असेल तर असा प्लॉट विकत घेवु नये.
 • घराचे मुख्य सेफ्टी डोअर लाकडाचे असावे असा वास्तु नियम असला तरी आपण घराला लोखंडी सेफ्टी डोअरच बसवावे, त्यामुळे परक्या व्यक्तीने दरवाजा उघडला तरी आवाज होऊन आपल्याला कळू शकते.
 • देवघरामध्ये दोन शिवलिंग, दोन शंख किंवा एकाच देवांच्या दोन मुर्त्या ठेवुन त्यांचे पुजन करू नये.
 • कुल दैवतांचे किंवा गुरूंचे नामस्मरण, जप किंवा पठन नित्यनियमाने १०८ वेळा केल्यास कार्यसिद्धी होते आणि आत्मबल, आत्मसामर्थ्य वाढते.
 • घराच्या, ऑफिसच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट, उतरता जिना किंवा डक्ट येत असेल तर असे घर किंवा ऑफिस विकत घेणे टाळणे यामुळे शुभ उर्जेची हानी होते.
 • सर्व कामांना सिद्धीस जाण्यासाठी इच्छापुर्ती होण्यासाठी आणि कोणत्याही संकटातुन मुक्ती होण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष वाचावे आणि उपासना, नामस्मरण करावे.
 • घरामध्ये रोज देवाची पुजा श्लोक पठण, दिवा - उदबत्ती, निरंजन, धुप - दीप लावणे अशा अध्यात्मिक गोष्टींचा नित्यनियमाने वापर केल्यामुळे घराला चांगले सुरक्षा कवच मिळते आणि आघातांची तीव्रता कमी होते.
 • कोणतेही शुभ काम करताना, प्रवासाला निघताना दिवसाचा राहु काळ पाहणे आवश्यक आहे आठवड्याचे राहु काळ खालील प्रमाणे.
  सोमवार – ७.३० am ते ९ .०० am
  मंगळवार – ३.०० pm ते ४.३० pm
  बुधवार – १२.०० pm ते १.३० pm
  गुरुवार – १.३० pm ते ३.०० pm
  शुक्रवार – १०.३० am ते १२.०० pm
  शनिवार – ९.०० am ते १०.३० am
  रविवार – ४.३० pm ते ६.०० pm
 • घराच्या पश्चिम दिशेला टेरेस, खड्डा, खुप मोठा उतार किंवा खोल दरी असेल तर कलह, व्याधी, त्रास, मनस्ताप किंवा दिर्घ आजारपण येऊ शकते त्यामुळे पश्चिमेला कोणताही खड्डा ठेवु नये.
 • जमिनीमध्ये अंडर ग्राउंड पाण्याची टाकी पुर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम या दिशा मध्ये येऊ देवु नये.
 • प्लॉट, बंगल्यावरती, कारखान्यात, फ्लॅटच्या स्किम मध्ये उंचावरती पाण्याची टाकी टेरेस चा नैऋत्य दिशेमध्ये, मध्य पश्चिमेमध्ये किंवा दक्षिणेमध्ये घेणे योग्य आहे.
 • ज्या घरात अंधार असेल किंवा उजेड येत नसेल अशा घरांना व्हाईट, ऑफ व्हाईट, क्रीम, लाईट पिस्ता असे हलके रंग दयावेत त्यामुळे लाईट रिफ्लेक्शन वाढते आणि घरातील समस्या कमी होण्यास मदत होते.
 • बंगल्याला, इमारतीला, इंडस्ट्रीला आतुन बाहेरून पिंक रंग देवु नये हा रंग दुर्बल असल्यामुळे आघातांचे प्रमाण वाढते त्यामुळे व्हाईट, ऑफ व्हाईट, क्रीम किंवा ऐवरी असे रंग दयावेत.
 • घरामध्ये तुटलेल्या आरशामध्ये, डाग पडलेल्या, रंग उडालेल्या, पारा पडलेल्या आरशामध्ये तोंड पाहु नये आणि आरसा नेहमी स्वच्छ ठेवावा.
 • घराचे दार – खिडक्या, खिडक्यांच्या काचा, फर्निचरचे कॉर्नर तुटलेले – फुटलेले असु नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामध्ये लवकरात लवकर बदल करावे.
 • तुटलेल्या मुर्त्या, जुन्या वस्तु, बंद पडलेल्या वस्तु अशा गोष्टींचा संग्रह घरामध्ये टाळावा.
 • नवीन घर, कारखाना, इंडस्ट्री विकत घेताना किंवा बांधताना वास्तू तज्ञाच्या सल्याने विकत घ्यावी त्यामुळे ती वास्तू आपल्याला लाभते आणि आपली प्रगती होते.
 • घरातील वास्तु दोष निवारणासाठी आणि सुख – समृद्धी साठी योग्य वास्तुतज्ञाकडून वास्तु व्हिझिट करून घेणे महत्वाचे आहे त्यामुळे ती वास्तु आपल्याला लाभते.
 • व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजेच ऑफिस, कारखाना, इंडस्ट्री किंवा व्यवसायाचे कोणतेही ठिकाण यामध्ये असणाऱ्या बांधकामातील वास्तु दोषामुळे व्यवसायावर परिणाम होऊ शकतो त्यासाठी वास्तु व्हिझिट करून योग्य त्या उपाय योजना कराव्यात.
 • घरातील पडदे हलक्या रंगाचे असावेत लाल, काळे, डार्क मरून किंवा भडक रंगाचे नसावेत.
 • घरातील पाली, झुरळे, सुक्ष्म जीवाणु यांचा त्रास होऊ नये यासाठी खडे मिठाच्या पाण्याने फर्शी पुसावी.
 • अधिक मासाच्या शुभ महिन्यामध्ये विष्णु सहस्त्रनाम, विष्णु उपासना, पुरुषोत्तम उपासना आणि विविध प्रकारच्या पुजा, धार्मिक कार्य करावे त्याची अधिक मासामध्ये अधिक फल प्राप्ती मिळते.
 • घराच्या छताला म्हणजे सिलिंगला लाल, काळा, मरून असे कोणतेही डार्क रंग देवु नये, सिलिंगला पुर्ण पांढरा रंग दयावा.
 • घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशांना भरपुर खिडक्या आल्या असतील तर तिथे ब्राउन कलरच्या काचा बसवाव्यात किंवा काचांना लाईट ब्लु कलरची फिल्म लावावी त्यामुळे अति तप्त उन्हाचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि घरामध्ये सुख - शांती वाढते.
 • घराच्या दक्षिण व पश्चिम दिशेला उंच वाढणारी वटवृक्ष, जाड बुंध्याची झाडे लावावी त्यामुळे अति तप्त उन्हाचा त्रास कमी होण्यास मदत होते.
 • घराच्या दक्षिण व पश्चिम दिशेला कोठेही विहीर, खड्डा, बोअरिंग घेवु नये त्यामुळे घरातील वादविवाद – चिडचिड वाढते आणि घराचे सुरक्षा कवच नाहीसे होते.
 • वास्तु मधील दोषांचे निवारण करण्यासाठी सुरुवात प्रथम ईशान्य दिशेतील वजन काढावे तिथे जास्त अवजड वस्तु ठेवु नयेत आणि नैऋत्य दिशा जड करावी तिथे मोकळी जागा ठेवु नये.
 • चप्पल ठेवण्याचे रॅक घराच्या बाहेर ठेवावे आणि रॅक बंदिस्त ठेवावे उघडे ठेवु नये त्यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही.
 • दोन फ्लॅट विकत घेऊन जोडुन एक फ्लॅट करायचा असेल तर वास्तुतज्ञाच्या सल्याने करावे त्यामुळे ब्रम्हस्थळाचा दोष आहे कि नाही याची खात्री होते.
 • नवीन घर, जागा, इंडस्ट्री विकत घेताना रस्त्यापासुन खाली उतरती म्हणजेच खड्यातील वास्तु विकत घेवु नये त्यामुळे नुकसान भरपुर होते आणि हवी तशी यश प्राप्ती होत नाही.
 • वास्तुमध्ये द्वार दोष निवारणासाठी आणि घरामध्ये वाईट शक्तीपासुन संरक्षणासाठी मुख्य दरवाजावरती पितळ धातुचा ओम लावावा.
 • वास्तुमधील नकारात्मक ऊर्जा निघुन जावी यासाठी नेहमी घराची आतील आणि बाहेरील फर्शी पांढऱ्या किंवा काळ्या खडे मिठाने पुसावी.
 • व्यवसायातुन मिळणारा पैसा किंवा पगारातुन येणारी रक्कम मिळाल्यानंतर पहिल्यांदा देवा समोर ठेवुन वापरण्यास सुरवात करावी त्यामुळे चांगली धनवृद्धी होते.
 • घरामध्ये चिड - चिड, वादविवाद किंवा डिप्रेशन होत असतील तर नित्याने नामस्मरण आणि ध्यान धारणा हि रोज करावी याचे फायदे भरपुर होतात.
 • नवीन फ्लॅट विकत घेताना आजुबाजूला मंदिराचे शिखर, स्मशान किंवा हॉस्पिटल घराच्या खुप जवळ नाही ना याची खात्री करूनच घर किंवा फ्लॅट विकत घ्यावे.
 • वास्तुमध्ये शुभ ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी घरामध्ये, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये, कारखान्यामध्ये दर अमावस्येला नारळ फोडावा व तो फेकुन दयावा.
 • घर नीटनेटके, सुंदर, आकर्षक ठेवणे आणि संपुर्ण घर स्वच्छ ठेवणे म्हणजेच वास्तुदेवतेचे पुजन केल्याप्रमाणेच आहे.
 • घरासाठी किंवा कोणत्याही बांधकामासाठी डोंगर उतारावरील किंवा डोंगराजवळील प्लॉट विकत घेवु नये त्यामुळे घराभोवतील ऊर्जा असंतुलित राहते.
 • घरामध्ये आळस, नैराश्य किंवा अस्वस्थ वाटत असेल तर घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तेलाचा दिवा रोज सकाळ - संध्याकाळ लावावा.
 • दर गुरुवारी गुरु चरित्र अध्याय चौदावा व अठरावा याचे नित्य नियमाने वाचन करावे त्यामुळे गुरु कृपा होते आणि गुरु बळाची ताकद वाढते.
 • घराच्या भिंतीवरील, छपरावरील, टेरेसवरील वाढलेले गवत, तण किंवा झाडे वेळच्या वेळी काढत जावे.
 • सुख – समृद्धी साठी घराची उत्तर, पुर्व आणि ईशान्य दिशा हलकी मोकळी आणि कमी वजनाची ठेवावी आणि दक्षिण, पश्चिम, नैऋत्य दिशा भरपुर जड, उंच, भक्कम करावी.
 • घराच्या सेंटर मध्ये (ब्रम्ह्स्थळ) कोणत्याही प्रकारचे वजन, अडथळा कोणतेही बांधकाम किंवा भिंत येऊ देवु नये.
 • सुख - शांती, समृद्धीसाठी आणि घरामधील नकारात्मक ऊर्जा बाहेर जावी यासाठी घरामध्ये रोज आग्नेय दिशा आणि ब्रम्ह्स्थळ या ठिकाणी कापुर जाळावा.
 • अखंड गुरुकृपा होण्यासाठी दत्तगुरूंचा आशिर्वाद आयुष्यभर मिळावा यासाठी दत्त स्तोत्र, गुरुचरित्र नित्यनियमाने दर गुरुवारी वाचावे आणि दत्ताच्या व स्वामींच्या देवळामध्ये दर्शनाला जावे.
 • कोणत्याही बेडरूम मध्ये बेड ठेवताना इलेक्ट्रिक स्विच, लाइन किंवा ऑन – ऑफ स्विच बटनांच्या बोर्ड पासुन बेड लांब ठेवावा त्यामुळे इलेक्ट्रिक वायर मधुन येणाऱ्या रेडीयेशन पासुन आपण आपल्या शरीराचा बचाव करू शकतो.
 • घराच्या पश्चिम किंवा दक्षिणेला विहीर, बोअरिंग किंवा खड्डा या कोणत्याही गोष्टी आल्या तर पैसा टिकत नाही आणि आजारपण वाढते.
 • घराच्या पुर्व दिशेला खिडकी नसेल तर घरामध्ये उत्साह, धडाडी आणि पराक्रम या गोष्टीची कमतरता जाणवते त्यामुळे घराच्या पुर्वेला भरपुर खिडक्या असणे उत्तम आयुष्याच्या दृष्टीने खुप लाभदायक आहे.
 • मास्टर बेडरूममध्ये कोणत्याही देवतांचे चित्रे लावु नयेत बेडरूमच्या दक्षिण भिंतीवरती श्री व सौ यांचा हसरा फोटो लावावा.
 • व्यवसायासाठी किंवा राहण्यासाठी जागा रेंटने घेत असाल तर ती सुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आहे कि नाही हे ही पाहुन घ्यावे त्यामुळे रेंटने घेतलेल्या जागेत हि सुख – समृद्धीचा लाभ होतो.
 • व्यवसाय यशस्वी होण्यासाठी भरपुर प्रयत्न, परिश्रम याचबरोबर तुमची जागा, इंडस्ट्री, कारखाना, ऑफिस वास्तुशास्त्रानुसार असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला चांगली सुख – समृद्धी मिळु शकते.
 • घराचा मुख्य दरवाजा कोणत्याही दिशेला असला तरी दरवाजा समोर ब्लु, ऑफ व्हाईट, ग्रीन रंगाचे पाय पुसणे असावे.
 • ऑफिस, घर, कारखाना, दुकान यांच्या मुख्य महाद्वारासमोर आत किंवा बाहेर पारटेशन, टेबल, खुर्ची, टिपॉय किंवा कुंडी असे कोणतेही अडथळे मुख्य दरवाजा मध्ये ठेवु नये त्यामुळे द्वारवेध होऊन आपल्या कामात अडथळे येऊ शकतात.
 • दक्षिण दिशेच्या दोष निवारणासाठी दक्षिण दिशेला जड, मोठे कन्सस्ट्रक्शन करावे आणि उंच वाढणारी झाडे लावावी, कंपाउंड वॉल मोठे करावे.
 • व्यवसायिक ठिकाणी ऑफिसमध्ये किंवा कारखान्यामध्ये खुप मोठे देवघर नसावे मोजक्याच देवांचे फोटो जागेच्या ईशान्य दिशेमध्ये लावावे व त्याची रोज पुजा करावी.
 • घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये झाडू, डस्ट बिन, फरशी पुसायचा कपडा हे कोणालाही दिसेल असे ठेवु नये बंद कपाटात ठेवावे.
 • किचनमध्ये डस्ट बिन गॅस ओट्याच्या खाली येऊ देवु नये पाण्याच्या सिंक खालील भागात ठेवावे.
 • कोणत्याही बेडरूम मध्ये शोभेचे कोणतेही झाड, प्लान्ट ठेवु नये त्यामुळे आरोग्य हानी होऊ शकते.
 • बेडरूम मध्ये फिश पॉट, खुप मोठा वॉटर फॉल, पाण्याचे पिंप किंवा बेडरूम जवळ पाण्याची टाकी नसावी त्यामुळे आरोग्य हानी होऊ शकते.
 • घरामध्ये भिंतीवरती मृत फुल-पाखरे, पक्षी, प्राणी यांचे पिस किंवा कोणतेही वाळलेल्या झाडाचे, फुलांचे अशा फ्रेम्स घराच्या भिंतीवरती कोठेही लावु नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 • घराच्या हॉल मध्ये वायव्य दिशेला काचेच्या बाऊल मध्ये छोटे शंख – शिंपले भरून ठेवावेत त्यामुळे लवकर परदेश गमनाचा योग येवु शकतो किंवा कामातील अडथळे काही प्रमाणात दुर होण्यास सुरवात होते.
 • घराच्या उत्तर – पुर्व दिशे मध्ये येणाऱ्या खिड्क्यानमधुन भरपुर सुर्य प्रकाश येणे हे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी असते त्यामुळे उत्तर – पुर्व दिशामधील खिड्क्यानमध्ये अडथळे असतील तर ते दुर करावेत त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते.
 • नवीन फ्लॅट किंवा जागा विकत घेताना किंवा घर बांधताना घराच्या नाभी स्थळामध्ये म्हणजेच ब्रम्हस्थळामध्ये भिंत, टॉयलेट, किचन अशा प्रकारचा अडथळा असल्यास अशी वास्तु विकत घेवु नये.
 • वास्तुतील वास्तु दोषामुळे माणसाचे मानसिक संतुलन बिघडु शकते आरोग्याच्या समस्या, अहंकार व फायनानशियल प्रोब्लेम वाढू शकतात हे टाळण्यासाठी योग्य वास्तु तज्ञाकडून वास्तु व्हिझिट करून घ्यावी त्यामुळे घरामध्ये चांगली सुख – समृद्धी लाभते.
 • घरातील नातेवाईक संबंध, इच्छा पुर्ती होणे, स्वप्नपुर्ती होणे यांचा संबंध घराच्या वायव्य दिशेशी असतो त्यामुळे घराच्या वायव्य दिशेमध्ये किचन किंवा देवघर येवु देवु नये असल्यास त्यावर वास्तु व्हिझिट करून योग्य त्या उपाय योजना कराव्यात.
 • बंगला, कारखाना, इंडस्ट्री किंवा फ्लॅट यांच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या किंवा उजव्या बाजुला दोन दरवाजे नसावेत एकच दरवाजा असावा त्यामुळे भाग्योदया मध्ये अडथळे निर्माण होतात.
 • घरामध्ये मन:शांती, उत्तम आरोग्य आणि एज्युकेशन वाढीसाठी घराच्या ईशान्य दिशेमध्ये गौतम बुद्धांची मेडीटेशन पोझ मधील मुर्ती अथवा संत ज्ञानेश्वरांची मुर्ती ठेवावी.
 • नवीन फ्लॅट विकत घेताना बेडरूम मध्ये टाईल्स खाली पाण्याचा पाईप, ड्रेनेज लाईन, इलेक्ट्रिकची वायर किंवा आर्थिंग वायर बेडरूम च्या मधुन गेली नाही ना याची खात्री करून फ्लॅट विकत घ्यावा त्यामुळे ज़िओपॅथिक स्ट्रेस वाढुन आरोग्य बिघडू शकते.
 • नवीन घरामध्ये, बंगल्यामध्ये किंवा इमारतीमध्ये झाड लावताना आठ फुट अंतर भिंतीपासुन ठेवावे त्यामुळे झाडांच्या मुळांचा धोका इमारतीला होत नाही आणि त्याच बरोबर उत्तर - पुर्व दिशेला छोटी झाडे, दक्षिण - पश्चिमेला उंच वाढणारी झाडे लावावी.
 • ईशान्य दिशेमध्ये असणारे टॉयलेट, किचन, कॉर्नर कट, जिना आणि कोणतेही जास्त उंचीचे बांधकाम हे घरातील सगळ्यांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभुत ठरते कारण ईशान्य दिशा हि घरामध्ये सकारात्मक प्राणशक्ती देणारी दिशा आहे आणि या दोषामुळे ईशान्यातील सकारात्मक उर्जेचा नाश होतो यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोब्लेम निर्माण होऊ शकतात.
 • घराच्या आग्नेय दिशेला वॉटर प्युरिफायर, पाण्याचा नळ, पिण्याचे पाणी अशा कोणत्याही गोष्टी आल्या तर स्त्रियांचे आजारपण वाढते.
 • घराच्या उत्तर दिशेला किचन कधीही असु नये त्यामुळे पाण्याच्या जागी अग्नी आल्याने घरामध्ये नेहमी वाद – विवाद, स्त्रियांचे आरोग्य बिघडणे, संपत्तीचा सतत नाश होणे अशा नकारात्मक गोष्टी नेहमी घरामध्ये घडतात त्यामुळे घराच्या उत्तरेला किचन घेवु नये.
 • घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर सलग दोन ते तीन दरवाजे आले तर घरामध्ये आजारपण, शारीरिक दुर्बलता, स्त्रियांचे आजारपण, दुर्भाग्य, पैसा न टिकणे अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे मुख्य दरवाजासमोर सलग दोन ते तीन दरवाजे येवु देवू नये.
 • ब्रम्ह्स्थळामध्ये असणाऱ्या कोणत्याही वजनामुळे किंवा वास्तुदोषामुळे घरामध्ये पोटांचे आजार, आरोग्याच्या तक्रारी आणि विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे चारही दिशांची लांबी, रुंदी मोजुन घराच्या चारही दिशांचा मध्यभाग जिथे येतो त्याला ब्रम्ह्स्थळ म्हणतात या ब्रम्ह्स्थळात कोणतेही वास्तुदोष येऊ देवु नये.
 • घराच्या ईशान्य दिशेमध्ये कचरा कुंडी, डस्ट बिन, झाडू, शु रॅक, खुप मोठे कपाट, टॉयलेट अथवा किचन असे वास्तुदोष घरामध्ये असल्यास चिड – चिड, वाद – विवाद, भांडणे होऊन आरोग्य बिघडू शकते त्यामुळे घराच्या पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या देवघराच्या जागे मध्ये म्हणजेच ईशान्य दिशेमध्ये वरील प्रमाणे कोणतेही दोष येवु देवू नयेत.
 • घरामध्ये झोपण्याची जागा दिशा चुकली तर आरोग्याच्या आणि अधोगतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे लहान मुलांनी पुर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपावे घरातील कमवत्या - कर्त्या व्यक्तीने दक्षिणेला डोके व उत्तरेला पाय करून झोपावे यामुळे सर्वांची सर्वांगीण प्रगती होते व आरोग्य हि चांगले राहते.
 • घराच्या पश्चिम – नैऋत्य दिशेमध्ये कॉर्नर कट, टेरेस, वाढ किंवा बाल्कनी असेल तर कर्ज वाढणे, आरोग्याच्या समस्या निर्माण होणे, अपघात होणे किंवा सतत अपयश येणे, घरामध्ये चोरी होणे अशा विविध समस्या नेहमी होऊ शकतात त्यामुळे नैऋत्य दिशेला वाढ किंवा टेरेस असणारे घर विकत घेवु नये जर असे असेल तर योग्य त्या वास्तुतज्ञा कडून व्हिझिट करून योग्य त्या उपाय योजना कराव्यात.
 • घरासाठी धुप उदबत्ती विकत घेताना शास्त्रोक्त आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या धुप व उदबत्तीचाच वापर घरामध्ये करावा सेन्टेड किंवा घातक केमिकल्स, कृत्रिम गोष्टी वापरून केलेल्या उदबत्ती, धुप मुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात त्यामुळे मसाला उदबत्ती किंवा योग्य धुपाचा वापर रोज पुजेसाठी करावा.
 • घरामध्ये जास्त काटेरी झुडपे, निवडुंग, चिक किंवा दुध येणारे वनस्पती घराच्या आसपास किंवा बागेमध्ये लावू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे औषधी वनस्पती व मनाला सुंदर वाटेल आणि आकर्षक दिसतील अशी झाडे लावावीत.
 • घराचा agriकरार, खरेदी खत किंवा कोणतेही चांगले काम करताना शुभ वेळ, शुभ दिवस ठरवुन रजिस्ट्रेशन ची तारिख घ्यावी अथवा पंचागात वास्तु खरेदीचा मुहर्त पाहूनच वरील महत्वाची कामे करावीत.
 • नवीन घर विकत घेताना किंवा बिल्डर कडून पझेशन घेताना पंचागामध्ये शुभ वेळ व शुभ दिवस पाहुन बिल्डर कडून घराचा ताबा घ्यावा.
 • नवीन घर विकत घेताल्यावर लवकरात लवकर घराचे वास्तु चा नियमानुसार फर्निचर करावे आणि वास्तुशांत करून वास्तुपुरुष आग्नेयेला स्थापन करावा मगच राहायला जावे.
 • घरातील नकारात्मक ऊर्जा, वातावरणातील दुषित ऊर्जा घरातुन बाहेर जावी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी यासाठी घरामध्ये घरामध्ये रोज खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी आणि आठवड्यातून एक वेळ गोमुत्र सिंचन करावे.
 • घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहु नये किंवा त्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी घराच्या प्रत्येक रूम मध्ये कागदी कप मध्ये खडे मीठ घराच्या उत्तर व दक्षिणेला ठेवावे.
 • किचनमध्ये रोज भाजणे, कापणे, चिरणे, तळणे, उकडणे अशा सर्व प्रक्रिया रोज होत असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन महिलांना नैराश्य, डिप्रेशन, आजारपण येवु शकते यासाठी किचन नेहमी स्वच्छ, नीट – नेटके, प्रशस्त आणि भरपुर उजेड असणारे असावे आणि किचन मध्ये ट्रॉली चा रंग हिरवा, पिस्ता, ऑफ व्हाईट असा असावा भडक रंग देणे टाळावे.
 • महिलांनी रोज स्वयंपाक करताना रेडीओ, एफ.एम किंवा आवडती गाणी चालु ठेवुन स्वयंपाक करावा त्यामुळे मन आनंदी, उत्साही आणि प्रफुल्लित राहते आणि स्वयंपाक पौष्टिक, सात्विक व चविष्ट बनतो व घरातील सर्वांचे आरोग्य चांगले रहाते.
 • घरामध्ये, कारखानामध्ये किंवा दुकानामध्ये अनेक वर्ष बंद पडलेल्या, गंजलेल्या, तुटलेल्या, तडे गेलेल्या अशा अनेक वस्तु लवकरात लवकर घरातुन किंवा आपल्या जागेतुन हद्द पार कराव्यात त्यामुळे आपल्या घरातुन नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सुख – शांती, समृद्धीचा चांगला अनुभव येईल.
 • आपली आणि आपल्या कुटुंबियांची भरपुर प्रगती होण्यासाठी आचार – विचार शुद्ध ठेवणे, शुद्ध बोलणे, सकारात्मक राहणीमान आणि आपल्या वास्तुची शुद्धता, पवित्रता नियमित जपणे या सर्व गोष्टी मुळे आपल्याला कायम यश मिळत राहते त्यामुळे आपल्या घरातील, शरीरातील सकारात्मक उर्जेचा प्रभाव आपल्याला नेहमी यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो.
 • वास्तुचे दोष निवारण करण्यासाठी जीवनशैली, सकारात्मक विचार, अतिशय उच्च विचार नेहमी आध्यात्मिक राहणे आणि पंचतत्वांची ऊर्जा घरामध्ये संतुलित ठेवण्यासाठी नित्य नियमाने होम हवन करावे आणि वास्तुदोषावरती विधिवत यंत्रोपचार तज्ञांचा मदतीने करून घ्यावे.
 • घराच्या उत्तर व पुर्व या शुभ देव दिशेतील खिडक्या – दारांमधील अडथळे दुर करावे आणि सकाळच्या वेळेमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत या शुभ दिशांमधुन येणारी ऊर्जा आपल्या घराला चांगले प्रोटेक्शन, सुख - समृद्धीचे आयुष्य देते त्यामुळे उत्तर व पुर्व दिशेला खिडक्या असणे खुप महत्वाचे आहे.
 • घराच्या ईशान्य आणि पुर्व दिशेला असणाऱ्या वास्तुदोषामुळे डोक्याचे आजार, केस गळणे, टक्कल पडणे, मानसिक संतुलन बिघडणे, अभ्यासामध्ये दुर्लक्ष होणे, घरामध्ये वादविवाद, चिडचिड वाढणे कायम स्वरूपी आजार सुरु होणे अशा गोष्टी ईशान्येतील वास्तुदोषामुळे होतात त्यामुळे तज्ञांचा सल्याने यंत्रोपचार करून घेणे.
 • आपल्या घराची उत्तर व वायव्य दिशा मनाशी निगडीत असते मनाची चंचलता, नैराश्य, डिप्रेशन, मानसिक ताण - तणाव, भांडणे, वादविवाद या सर्व गोष्टी या दोन दिशेमध्ये असणाऱ्या वास्तुदोषामुळे येऊ शकतात त्यामुळे तज्ञांचा सल्याने यंत्रोपचार करून घेणे त्यामुळे घरामध्ये सुख – समृद्धी लाभते.
 • प्रत्येक व्यक्तिने श्रद्धा, उपासना, श्लोक पठण, देवपुजा, नित्य शुद्ध कर्म, शुद्ध आचरण आणि सकारात्मक विचार या सर्व गोष्टींचे पालन केले तर माणसाला ऐश्वर्य प्राप्ती, यश प्राप्ती मिळवणे सहज सोपे होते म्हणुन वरील सर्व गोष्टी अमलात आणाव्यात.
 • घराच्या मुख्य उंबऱ्याला लाल रंग, लाल रंगाचे स्टिकर, दारात लाल रंगाचे पाय पुसणे किंवा दरवाजावरती लाल रंगाचा बल्ब हे सगळे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे आहे या रंगाचा वापर मुख्य दरवाजावरती कोठेही करू नये.
 • घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महाद्वार याचा चौकटीच्या दरवाजाचा रंग उडालेला नसावा दरवाजाच्या आजुबाजूच्या फरश्या तुटलेल्या – फुटलेल्या नसाव्यात. दरवाज्याच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ, सुशोभित व आकर्षक असा असावा आणि प्रवेशद्वाराच्या बाहेर तुळशीचे रोप असावे नित्य नियमाने रोज रांगोळी काढावी यामुळे घरामध्ये अष्टलक्ष्मीचा आशिर्वाद कायम राहतो.
 • घरामध्ये असणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बिघडते आणि वास्तुमधील आनंदी वातावरण दु:खी होते व वास्तुतील वातावरण बिघडल्यामुळे घरामध्ये आरोग्य बिघडणे, कर्जबाजरी होणे अशा गोष्टी घडु शकतात यासाठी वास्तु तज्ञाकडून वास्तु व्हिझिट करून घर सकारात्मक करून घेणे.
 • घरामध्ये रंग उडालेल्या भिंती, तडे गेलेला स्लॅब, तुटलेल्या फरश्या, तुटलेले - कुजलेले फर्निचर, बंद पडलेले सामान, बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तु यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन घरामध्ये आळस, ताण – तणाव, उल्हास नसणे, झोप न लागणे, आजारपण अशा गोष्टी घरामध्ये होऊ लागतात यासाठी वास्तु व्हिझिट करून आपल्या घरात कोणत्या प्रकारची वाईट ऊर्जा आहे हे जाणून त्याचे निराकरण करून घ्यावे.
 • vyavsayव्यवसायामध्ये अपयश, कर्ज बाजरी होणे, फायनानशियल प्रोब्लेम वाढणे, घरात पैसा न टिकणे यासाठी हिरव्या रंगाचा घरामध्ये भरपुर वापर करावा, हिरव्या रंगाचे कपडे धारण करावे आणि योग्य तज्ञाच्या सल्याने उजव्या हाताच्या करंगळी मध्ये ओरीजनल ३ कॅरेटचा पाचु हा रत्न सोन्याच्या अंगठीत बसवुन बुधवारी सकाळी धारण करावा.
 • घरातील वाद – विवाद, चिड – चिड. भांडणे कमी व्हावी यासाठी घराच्या वायव्य दिशेमध्ये कोणत्याही बंद पडलेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या वस्तु ठेवु नयेत सुंदर आकर्षक फुले ठेवावी लाल व भडक रंगाची नकोत. वायव्य दिशा जास्त सुगंधित राहील यासाठी अत्तर, रूम फ्रेशनर किंवा नैसर्गिक अरोमा ऑईल चा लॅम्प तेथे लावावा.
 • आपल्या घरामध्ये बेड, दरवाजे, कपाटे, पोटमाळे, भिंती फर्निचर, किचन ट्रॉली च्या खाली असलेली धुळ, जाळ्या जळमटे, किटण हे आपल्या आरोग्यास हानी पोहचवु शकते यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी या सर्व गोष्टी स्वच्छ कराव्यात व आपली वास्तु आरोग्यदायी व तथास्तु ठेवावी.
 • देवघर हे शिसम लाकडाचे, सागवानी लाकडाचे असावे किंवा संगमरवरी सुद्धा चालेल परंतु देवघराला प्लायवुड, रबर, प्लास्टिक, लोखंड, पत्रा किंवा हलक्या प्रतीचे कोणतेही लाकुड देवघरासाठी वापरू नये यामुळे देवघराचे पावित्र्य कमी होते.
 • देवघर हे घरामध्ये जिन्याखाली, किचन ओट्याखाली, पोटमाळ्या खाली किंवा टेरेस - बाल्कनीमध्ये देवघर ठेवु नये देवघर हे घराच्या ईशान्य किंवा पुर्व दिशेस ठेवावे पुजा करताना आपले तोंड पुर्वेला होईल आणि देवाचे तोंड पश्चिमेला होईल अशा पद्धतीने ठेवावे त्यामुळे देव तत्वांचा आशिर्वाद कायम स्वरूपी घराला राहतो.
 • आपल्या घरातील देवघर हे भिंतीला टांगलेले किंवा रॅकवर अडकवलेले असु नये देवघर आपण पाटावर बसुन पुर्वेला तोंड करून व्यवस्थित विधिवत पुजा करता येईल अशा पद्धतीने घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे देवघर जमिनीवर ठेवल्याने पाटावर बसुन पुजा केल्याने पुजेचा संपुर्ण लाभ होतो.
 • देवघर हे शक्यतो पांढऱ्या संगमरवराचे घ्यावे संगमरवरामध्ये नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा असते आपल्या घरातील देव या संगमरवरी देवघरात स्थापन केल्याने देव तत्वांच्या उर्जेचा आणि संगमरावरातुन येणाऱ्या सकारत्मक उर्जेचा सुयोग्य मिलाप होऊन आपल्या घरातील ईशान्य दिशेमधील ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित होण्यास मदत होते आणि आपले आयुष्य सुख – समृद्धीदायक होते.
 • नवीन घर विकत घेताना किंवा नवीन घर बांधताना आपल्या घरात देवघरासाठी सर्वोत्तम योग्य जागा आहे का पाहुनच मग घर खरेदी करावे देवघरासाठी सर्वोत्तम जागा ईशान्य दिशा, पुर्व दिशा, मध्य उत्तर दिशा हि आहे या व्यतिरिक्त कोणत्याही दिशेमध्ये देवघर ठेवणे वास्तुशास्त्र संमंत नाही.
 • घरातील देवघर उंचीला ३१ ते ३५ इंच असावे आणि रुंदीला २१ ते २५ इंच रुंद असावे यापेक्षा जास्त मोठे देवघर असु नये देवघराचा आकार आपल्या घराच्या आकारमानाला साजेसा आणि ऊर्जा वलय संतुलित ठेवणारा असावा त्यामुळे देवघर घरात असण्याची आणि रोज केलेल्या पुजेची यथायोग्य फलप्राप्ती कुटुंबास मिळत राहते.
 • देवाची पुजा करताना जमिनीवर पाट ठेवुन पाटावर बसुन पुजा करावी खुर्ची, टेबल, उभे राहुन किंवा स्टुलवर बसुन देवाची पुजा करू नये पाटावर बसुन केलेल्या पुजेचा सर्वार्थाने लाभ होतो.
 • देवघरामध्ये देवाची पुजा करताना चांगल्या प्रतीचे अष्टगंध किंवा प्युअर हळदीचे कुंक वापरावे कृत्रिमरीत्या तयार केलेले रासायनिक कुंक किंवा अष्टगंध देव पुजेसाठी वापरू नये त्याचा देवाच्या मुर्तीवर परिणाम होऊन डाग पडु शकतात, देवाची मुर्ती, फोटो यांची जीझ, हानी होऊ शकते त्यामुळे योग्य प्रकारचे प्युअर हळदीचे कुंक, अष्टगंध देवपुजेसाठी वापरावे.
 • घरातील देवघरामध्ये देवांचे फोटो किंवा मुर्ती या पायऱ्यांवरती उतरत्या अशा ठेवु नयेत देवघरात पायऱ्या असतील तर काढुन टाकाव्यात सर्व देव - देवतांची मांडणी समान व सुटसुटीत राहील अशा पद्धतीने करावी देवांचे फोटो किंवा मुर्ती खुप मोठ्या असु नयेत देवघराचा व मुर्तीचा आकार घराला संतुलित व साजेसा असावा त्यामुळे देवपुजेचा लाभ घराला योग्य रित्या मिळतो.
 • संगमरवरी किंवा लाकडी देवघर बनवताना देवघराला कोणत्याही प्रकारचा कळस किंवा शिखर असे चालत नाही देवघरावरती प्रभावळ, कमान, स्वस्तिक, ओम किंवा गणपतीचे चित्र अशी चिन्हे असेल तर चालते परंतु घरातील देवघरावरती कळस किंवा शिखर नसावे त्यामुळे घरामध्ये अति ऊर्जेचे वलय तयार होऊन वातावरण असंतुलित होण्याचे प्रमाण वाढू शकते.
 • आपल्या घरातील देवघरामध्ये एकाच देवांच्या दोन मुर्ती, दोन फोटो, दोन टाक, दोन प्रतिमा अशा ठेवु नयेत एकाच देवाच्या एकच मुर्ती किंवा फोटो देवघरामध्ये पुजेसाठी ठेवावी याचे कारण पुजा करताना दोन देवाच्या प्रतिमा असतील तर आपली द्विधा मनस्थिती होते त्यामुळे एकाच प्रतिमेची पुजा करणे योग्य आहे त्यामुळे मन:शांती लाभते व देवकृपा अखंड राहते.
 • देवघर मास्टर बेडरूम मध्ये ठेवु नये घराची नैऋत्य, दक्षिण व पश्चिमेला देवघर ठेवणे शास्त्र संमत नाही आणि कोणत्याही बेडरूम मध्ये देवघर ठेवणे योग्य नाही देवघर घराच्या उत्तर व पुर्व या शुभ दिशा व शुभ ऊर्जा देणाऱ्या दिशा ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्या कोपऱ्याला ईशान्य दिशा म्हणतात याच ठिकाणी देवघराची स्थपना करावी म्हणजेच कुटुंबाचे कायम स्वरूपी कल्याण होते.
 • नवीन घर विकत घेताना वास्तुच्या नियमानुसार कमीत कमी ७० टक्के सकारात्मक असणारे घर विकत घ्यावे वास्तुचे नियम ६० ते ७० टक्क्यापर्यंत चे नियम ज्यावास्तु मध्ये वापरले गेले असतील अशी वास्तु कायमस्वरूपी सर्व कुटुंबाना लाभदायी ठरते, प्रगती व यश मिळते आणि आपल्या कुटुंबाला संरक्षित करते अशी वास्तु योग्य वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने विकत घ्यावी.
 • वास्तुशास्त्राद्वारे तुम्हाला घर, प्लॉट, फ्लॅट, इंडस्ट्री, बंगलो विकत घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष जागेवर साईट व्हिझिट करून वास्तु कन्सल्टन्सी करून जागा वास्तुच्या नियमानुसार योग्य आहे कि नाही पाहुनच जागा खरेदी करावी प्लान वरून वास्तु योग्य आहे कि नाही हे ठरवता येत नाही आणि प्लान वरून वास्तु किंवा जागा ८ टक्के कळते आणि ९२ टक्के वास्तुतील गुण - दोष कळत नाही त्यामुळे प्लान वरून वास्तु कन्सल्टन्सी कधीहि घेवु नये प्रत्यक्ष साईट व्हिझिट होणे महत्वाचे आहे.
 • घरामध्ये सकाळी दिवसाची सुरवात उत्तम व्हावी वास्तुचे व्हायब्रेशन सकारात्मक व्हावे यासाठी सकाळी घरामध्ये गायत्री मंत्र, सकाळचे राग असणारे शास्त्रीय संगीत, इनस्टुमेंटल म्युझिक, ललित सहस्त्रनाम किंवा कोणतेही स्तोत्र अथवा श्लोकांची सी.डी सकाळी लावावी त्यामुळे वास्तुमध्ये शुभ ऊर्जा उत्पन्न होऊन आपला दिवस चांगला जातो.
 • नवीन फ्लॅट विकत घेताना दक्षिण, पश्चिम, नैऋत्य, आग्नेय दिशा असा एन्टरन्स असणारा फ्लॅट विकत घेवु नये शुभ दिशा असणारा पुर्व, उत्तर, ईशान्य अशा शुभ दिशांचा एन्टरन्स बघुन वास्तु विकत घ्यावी आणि वास्तुतज्ञाच्या सल्याने प्लॉट, फ्लॅट, बंगलो विकत घ्यावी आणि चुकुन सुद्धा दक्षिण किंवा पश्चिम मुखी फ्लॅट विकत घेवु नये.
 • ऑफिस, दुकान, कारखाना किंवा कोणतीही कमर्शियल जागा या ठिकाणाचे देवघर खुप मोठे नसावे अशा ठिकाणी देवघर करताना गणपती, दत्त, लक्ष्मी यांचा फोटो ठेवावा कमर्शियल जागेत खुप मोठी मुर्ती किंवा फोटो ठेवु नयेत कारण कमर्शियल जागेत देवघराचे पावित्र्य राखले जात नाही आणि घरातील देवघराप्रमाणे त्याची रोज मोठी पुजा सुद्धा करू नये फक्त गंध फुल वहावे व अगरबत्ती लावावी.
 • ऑफिस, दुकान, कारखाना यामध्ये सेलिंग काऊंटर, कॅश काऊंटर, मालक, व्यवस्थापक, प्रमुख व्यक्ती यांचे टेबल उत्तर मुखी ठेवावे म्हणजेच उत्तरेला तोंड करून बसावे व व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाने उत्तरेला तोंड करून बसल्याने व्यवसायामध्ये उत्तरोत्तर भरपुर प्रगती होते आणि व्यवसायाची कायम भरभराट होते चुकुन सुद्धा दक्षिण - पश्चिमेला तोंड करून बसु नये.
 • ऑफिस, दुकान, कारखाना, इंडस्ट्री किंवा कोणतेही कमर्शियल प्रोजेक्टची नेम प्लेट, लोगो, लेटर हेड, ऑफिस स्टेशनरी यांच्यासाठी ब्लु, स्काय ब्लु, ग्रीन, पिस्ता, लाईट ऑरेंन्ज अशा रंगाचा वापर करावा लाल, काळा, मरून आणि कोणतेही डार्क कलर वापरू नयेत त्यामुळे व्यवसायामध्ये प्रगतीच्या मार्गात अडथळे येऊ शकतात व्यवसाय सुरु होऊन बंद पडु शकतो हवे तसे यश मिळु शकत नाही तरी वरील सांगितलेल्या रंगाचा वापर व्यवसायाच्या नेम प्लेटसाठी करावा.
 • घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये सुर्यप्रकाश , उजेड आणि वारा हा नेहमी खेळता राहिला पाहिजे त्यामुळे घरामध्ये चांगली ऊर्जा तयार होऊन आरोग्याच्या तक्रारी दुर होतात खोल्यामध्ये अंधार असेल कोठेच प्रकाश पोहचत नसेल तर घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी समस्या वाढु शकतात वास्तुदोषाचे विपरीत परिणाम घरावरती होण्यास सुरु होतात त्यामुळे नवीन घर घेताना चारही दिशांना खिडक्या असणारे हवेशीर मोकळे वातावरण असलेले घर, फ्लॅट विकत घ्यावे.
 • मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घराच्या पुर्व दिशेला भरपुर खिडक्या असणे खुप महत्वाचे आहे ज्या घराच्या पुर्व दिशेला खिडक्या दरवाजे नसतात अशा घरामध्ये मुलांची शैक्षणिक प्रगती थांबते, मेमरी कॉन्सनट्रेशन होत नसल्यामुळे आळशी, निरुत्साही होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे घर विकत घेताना पुर्वेला खिडक्या असाव्यात आणि त्या रोज सकाळच्या वेळेमध्ये उघड्या ठेवाव्यात.
 • उत्तम प्रगतीसाठी, धनलाभ होण्यासाठी, चांगली शैक्षणिक प्रगतीसाठी आणि घरामध्ये मन:शांती साठी घराच्या ईशान्य दिशेमध्ये संपुर्ण जागा मोकळी करून तिथे पाण्याचा फवारा, पाण्याचे कारंजे, फिश पॉट, वॉटर फॉल, तांब्याच्या कळशी मध्ये पाणी भरून ठेवावे आणि त्याच बरोबर देवघर सुद्धा ईशान्य दिशेमध्ये ठेवावे त्यामुळे घराची सर्वागीण प्रगती होते आणि कायम स्वरूपी आयुष्य सुखी राहते.
 • घरामध्ये अभ्यासाचे टेबल, कॉम्पुटरचे टेबल किंवा घरामध्ये घरगुती व्यवसायाच्या ऑफिसचे टेबल घरामध्ये उत्तर किंवा पुर्व या दोन शुभ दिशांकडे तोंड करून बसता येईल अशा पद्धतीचे करावे चुकुन सुद्धा दक्षिण, पश्चिम, नैऋत्य दिशेला तोंड करून वरील दिशांकडे तोंड करून बसु नये शुभ दिशांकडे तोंड करून केलेल्या प्रत्येक कामाची फलप्राप्ती उत्तम मिळते व चांगले यश कायम स्वरूपी मिळत राहते.
 • घर बांधताना किंवा नवीन घर विकत घेताना पोट माळा किंवा लॉफ्ट हे दक्षिण, पश्चिम, नैऋत्य, वायव्य किंवा आग्नेय दिशेला असावे त्यामुळे घरामध्ये जड सामान भरपुर जडत्व या दिशामध्ये आल्यामुळे घराचे चुंबकीय तत्व संतुलित राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरामध्ये चांगला राहतो त्यामुळे आपोआप सुख – समृद्धी मध्ये वाढ होते.
 • शुद्ध वास्तु सात्विक वास्तु, सुंदर वास्तु, आकर्षक वास्तु आणि निरोगी वास्तु आपल्या कुटुंबियांना सुख – समृद्धीदायक आयुष्य प्रदान करते त्यामुळे आपले घर योग्य वास्तुतज्ञाच्या सल्याने वास्तुशास्त्रानुसार बांधावे किंवा वास्तु व्हिझिट करून प्रत्यक्ष राहत्या घराचे वास्तुदोष निवारण करून घ्यावे त्यामुळे आयुष्यातील वेळ, पैसा, वय, आयुष्य, श्रम कधीही वाया जात नाही आणि आपली कायम स्वरूपी चांगली प्रगती नेहमी होत राहते.
 • नवीन घर बांधताना घराच्या वायव्येला, नैऋत्येला, दक्षिणेला या दिशांना हॉल असेल तर तेथे कोठेही चढ – उतार, खड्डा किंवा अति उंच चढ ठेवु नये त्यामुळे भुमीचा समतोल बिघडुन वास्तुदोषाचे बळ वाढते आणि घरामध्ये विविध प्रकारचे त्रास उद्भभवु शकतात.
 • घराच्या आसपास बाभळी सारखी काटेरी झाडे, निवडुंगासारखी वृक्ष, ज्या झाडाची पाने खाली वाकलेली, गळून गेलेली, वाढ खुंटलेली झाडे किंवा निर्जीव झालेली वृक्ष घराच्या शेजारी असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरून घराला त्रास होऊ शकतो.
 • वैवाहिक जीवन उत्तम राहावे आणि कौटुंबिक सुखाचा आनंद व्यवस्थित घेता यावा यासाठी घरातील कर्त्या स्त्री व पुरुषाने घराच्या नैऋत्य दिशेमध्ये म्हणजेच साउथ – वेस्ट मध्ये असणाऱ्या बेडरूममध्ये झोपावे झोपताना पाय उत्तरेला करावे तिजोरी आणि कपाटे दक्षिण भिंतीला लावावे बेडरूममध्ये प्रवेशद्वार उत्तर किंवा ईशान्येला असावे म्हणजेच सर्वांगीण प्रगती होते व सर्व सुखांचा लाभ नित्य होतो.
 • घराच्या मुख्य दरवाज्याच्या आजुबाजुला कोठेही अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, शुज, झाडू, केरसुनी, फरशी पुसण्याचे साहित्य आणि कचरा पेटी हे दरवाजामध्ये प्रवेश करताना सहज दिसेल असे ठेवु नये यामुळे प्रवेशद्वारात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये भांडणे, वादविवाद, चिड – चिड वाढतात आणि अशा गोष्टी मुळे आपण दुर्भाग्यास आमंत्रण देतो व माणुस नेहमी अपयशी ठरतो म्हणुन अशा गोष्टी दरवाजाच्या जवळ, आत – बाहेर ठेवु नये.
 • घरामध्ये शांत झोप लागावी यासाठी बेडच्या जवळ मोबाईल चार्जिंगला लावु नये किंवा मोबाईल जवळ ठेवु नये आणि बेडरूममध्ये असणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस म्हणजेच टि.व्ही, टेप बंद ठेवावे आणि बेडरूम वरती टांगते झुंबर नसावे त्यामुळे शांत झोप लागत नाही व आरोग्य बिघडते.
 • घरामध्ये खुप आजारपण, अपयश, चिड – चिड, कर्जबाजरी होणे अशा गोष्टी होत असतील तर घराच्या ईशान्य, उत्तर व पुर्व दिशेच्या प्रभागामध्ये भरपुर लाईट किंवा प्रकाश योजना करावी निळा, आकाशी, दुधी व पांढरा रंग असा स्वच्छ प्रकाश देणारे झुंबर, हंड्या अथवा एल.ई.डी लाईटच्या सहाय्याने भरपुर प्रकाश योजना करावी म्हणजेच ईशान्येतील सकारात्मक ऊर्जा वाढुन घरामध्ये चांगले रिझल्ट मिळतात.
 • घरातील सर्व बेडरूमच्या ईशान्य, पुर्व, उत्तर दिशेमध्ये कोणतेही कपाट, बेड, इस्त्री, इन्व्हरटर, ए.सी अथवा पाण्याचा साठा, बंद पडलेल्या वस्तु, अडगळ भंगार ठेवु नये त्यामुळे ईशान्य दिशेमध्ये जडत्व व नकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र तयार होऊन झोपेवर परिणाम होतो निद्रानाशेचा विकार होऊ शकतो व आरोग्य बिघडत जाते त्यामुळे बेडरूमची ईशान्य दिशा हलकी ठेवावी व दक्षिण – नैऋत्य जड करावी.
 • शरीरातील उर्जेची कमतरता अन्नाबरोबर घरातील ऊर्जा सुद्धा भरून काढण्यास मदत करत असते जसे आपण शुद्ध व सात्विक अन्न रोज खातो, स्वच्छ पाणी पितो त्याचप्रमाणे घरातील उर्जेचे वलय शुद्ध सात्विक राहावे आणि आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घरातील शुभ उर्जेची मदत व्हावी यासाठी आपले घर योग्य अनुभवी वास्तुतज्ञा कडून आपले घर वास्तुनुसार करून घ्यावे.
 • घरामध्ये संपुर्ण हॉल मध्ये कधीही अंधार ठेवु नये हॉल मधील खिडक्या - दारे सकाळच्या वेळेमध्ये उघड्या ठेवाव्यात आणि भरपुर प्रकाश घरामध्ये येईल अशा पद्धतीने हॉल ची रचना असावी आणि सुर्यास्तानंतर सुद्धा हॉल मध्ये एल.ई.डी दिवा, झुंबर अशा विविध प्रकारच्या भरपुर प्रकाश देणारे लाईट्स लावुन आपल्या घराचा हॉल जास्तीत जास्त ऊर्जा वर्धक ठेवावा याचे कारण घराचा हॉल म्हणजे आपला चेहरा आहे तो अतिशय शुद्ध, सात्विक व प्रकाशमान नेहमी ठेवावा त्यामुळे भाग्यातले अडथळे दुर होतात.
 • दर ३ ते ६ महिन्यांनी घरातील झाडू, फरशी पुसण्याचे कापड, पाय पुसणे, कचरा पेटी बदलावी रोज त्याचा वापर केल्यामुळे त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा भरलेली असते अनेक दिवस त्या वस्तु वापरल्याने त्यामध्ये धुळ, जीवाणु, सुक्ष्म जंतु जाऊन बसतात व त्याचा पुन्हा वापर केल्याने ते घरात पसरून आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात.
 • रोज सकाळी ६ ते ९ या वेळेत घरातील देवांची पुजा ईशान्य दिशेमध्ये रोज नित्य नियमाने करावी देवांच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने आंघोळ घालुन पुसून अष्टगंध लावुन फुले वहावीत ताजे सुंदर फुल वहावे धुप, दीप, उदबत्ती लावावी निरंजनाने देवाला ओवाळावे दुध साखरेचा नैवेदय दाखवावा नामस्मरण करीत पुजा करावी श्लोक वाचावे, आरती करावी व अशीच नित्य सेवा दररोज करून घे व मला आणि कुटुंबाला कायम सुखी ठेव, आरोग्यदायी जीवन दे अशी रोज प्रार्थना करावी.
 • घरातील देवघरामध्ये तेलाचा दिवा, समई किंवा निरंजन देवघराच्या आग्नेयेला ठेवावे देवघरामध्ये कोणत्याही प्रकारचा बल्ब लावु नये त्यामुळे देव पुजा केल्यानंतर देवतत्वाचे तेज विजेच्या दिव्यामुळे लोपले जाते व आपल्या घराला देव पुजेचा लाभ होत नाही म्हणुन मोठमोठ्या मंदिरामध्ये देवाच्या गाभाऱ्यात तेल तुपाचे दिवे किंवा समया सतत चालु ठेवल्या जातात कोणतेही ट्युब लाईट वापरल्या जात नाही. (उदा - तिरुपती बालाजी मंदिर).
 • धनवृद्धी साठी नक्षीदार सोनेरी रंगाची गजलक्ष्मी म्हणजेच सोनेरी नक्षीदार हत्ती ज्याची सोंड सलामी देणारी छोट्या आकाराचा हत्ती उत्तरेला तोंड करून घरामध्ये ठेवावा त्याची स्थापना कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी पंचागामध्ये शुभ दिवस पाहुन त्याची स्थापना करावी आणि दिवाळीच्या लक्ष्मी पुजनाला त्याची पुजा करावी त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी आगमन वाढते आणि मिळालेले धन स्थिर राहण्यास मदत होते.
 • घरामध्ये पैसे टिकत नाहीत याचे कारण आपण घरामध्ये पैसेच ठेवत नाही आपल्या घराची तिजोरी घराच्या नैऋत्य दिशेला म्हणजेच दक्षिण व पश्चिमेच्या कोपऱ्यामध्ये ठेवावी आणि तिजोरीमध्ये कमीत कमी ५ ते १०.००० रुपये कॅश कायम ठेवावी तिजोरी किंवा कपाट ठेवणे शक्य नसेल तर नैऋत्य दिशेला पैशाच्या नोटांचे रेडीमेड पोस्टर किंवा पेंटिंग लावणे त्यामुळे पैसे घरामध्ये साठण्यास मदत होते व पैशाला पैसा जोडत राहिला कि आपण हळुहळु श्रीमंती कडे वाटचाल करू लागतो.
 • घरामध्ये असणारे टॉयलेट, बाथरूम, ड्राय बाल्कनी याचे दरवाजे कायम स्वरूपी बंद ठेवावेत दरवाजे उघडे ठेवल्यामुळे टॉयलेट, बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरते आणि प्रदूषित वातावरणामुळे घरामध्ये सगळ्यांचे आरोग्य बिघडते यामुळे टॉयलेट, बाथरूम मध्ये कागदी कपामध्ये खडे मीठ घालुन ठेवणे व ते दर पंधरा दिवसांनी बदलणे आणि टॉयलेट, बाथरूमच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवणे.
 • नवीन फ्लॅट विकत घेताना फक्त फ्लॅट किंवा इमारत पाहु नये इमारती पासुन १०० ते ५०० फुटाच्या परीसरामध्ये कोणकोणत्या सकारात्मक व नकारात्मक अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या प्रमाणे डोंगर, मंदिर, हॉस्पिटल, स्मशान, चर्च, गुरुद्वार, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मंगल कार्यालय आणि अतिशय गजबजणारी ठिकाणे या गोष्टी आहेत किंवा नाही हे सुद्धा पाहुन फ्लॅट घेण्याचे ठरवावे कारण घरातील व बाहेरील उर्जांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो त्यामुळे वास्तु तज्ञाच्या सल्याने घर विकत घ्यावे.
 • आपल्या घराची दक्षिण व पश्चिम दिशा म्हणजेच नैऋत्य दिशा हि घरामध्ये स्थिरता, दिर्घ आयुष्य, धनवृद्धी आणि आयुष्यातील सर्व सुख व आनंद देणारी दिशा आहे या ठिकाणी टॉयलेट, अंडर ग्राउंड, पाण्याची टाकी बोअरिंग, विहीर, तळे जमिनीतील पाण्याची टाकी अशा कोणत्याही गोष्टी येवु देवु नये त्यामुळे विविध प्रकारच्या समस्या घरामध्ये निर्माण होऊ शकतात योग्य वास्तु तज्ञाच्या सल्याने घर वास्तुशास्त्रा नुसार करून घ्यावे.
 • परीक्षेचा कालावधी सुरु असल्यामुळे मुलांना घराच्या पश्चिम दिशेला म्हणजेच पुर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत बंद पडलेल्या तुटलेल्या - फुटलेल्या, अडगळ भंगार वस्तु ठेवु नये अभ्यासाची खोली प्रसन्न, आरामदायक व स्वच्छ ठेवावी मुलांची मानसिकता बिघडणार नाही याची काळजी घरामध्ये नक्की घ्यावी त्यामुळे घरामध्ये प्रसन्न व आनंददायी वातावरण राहील व मुलांचा अभ्यास देखील चांगला होईल.
 • मुलांच्या परीक्षेच्या कालावधी मध्ये घरामध्ये गणपती अथर्वशीर्ष याचे वाचन करावे, गणपती नामस्मरण करावे मुलांनी रोज प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचावे आणि पुर्व दिशेला तोंड करून अभ्यासाला बसावे आणि रात्री झोपताना पुर्वेला डोके व पश्चिमेला पाय करून झोपावे व परीक्षेच्या कालावधी मध्ये कोणत्याही पद्धतीचे वादविवाद होणार नाही घरातील वातावरण आनंदी व प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी.
 • आपल्या घराच्या आणि दुकानाच्या साउथ - वेस्ट म्हणजेच नैऋत्य दिशेला तिजोरी किंवा पैसे ठेवायचे कपाट नसेल तर त्या ठिकाणी पैसे किंवा नोटांचे पोस्टर, पेटिंग, फ्रेम केलेले चित्र उत्तरेला तोंड करून लावावे नैऋत्य दिशा हि धन टिकवणारी दिशा असल्यामुळे घरामध्ये पैसे टिकायला सुरवात होते म्हणुन नैऋत्य दिशेला जड वस्तु व पैशाचे पोस्टर लावावे.
 • कोणतीही वास्तु विकत घेताना खड्यामध्ये असणारी वास्तु विकत घेवु नये जमिनीला समांतर आणि रस्त्या पेक्षा उंच असणारी वास्तु लाभदायक ठरते. ऑफिस, दुकान, घर, हॉटेल, इंडस्ट्री, फार्म हाउस या सगळ्यांसाठी खड्यातील जागा, बेसमेंट मधील किंवा खड्यामधील उतरती जागा विकत घेणे किंवा भाड्याने घेणे टाळावे त्यामुळे खड्यामधील जागेत व्यवसाय सुरु केल्यामुळे यश मिळणे कठीण जाते व सर्व प्रकारच्या समस्यांनी व्यवसाय अडचणीत येऊ शकतो.
 • प्लॉट विकत घेताना विदिशा म्हणजेच क्रॉस डायरेक्शन असणारा प्लॉट विकत घेवु नये त्यामुळे मूळ दिशा किंवा उपदिशांना कॉर्नर कट येतो आणि दिशांची शुभ ऊर्जा घराला मिळत नाही बांधकाम केले तरी दिशांचे गुण, दिशांची ऊर्जा घराला लाभत नाही त्यामुळे शेती, प्लॉट, फ्लॅट विकत घेताना ९० अंशा मध्ये उत्तर किंवा पुर्व दिशा पाहुन वास्तु तज्ञाच्या सल्याने सुयोग्य अशी वास्तु विकत घ्यावी त्यामुळे कायम स्वरूपी सुख – समृद्धी मिळते.
 • वास्तु पॉझिटीव्ह तर लाइफ पॉझिटीव्ह शरीराची आणि घराची वास्तु शुद्ध, सात्विक आणि उत्तम संस्कारासहित आपण सुयोग्य ठेवली तर आपले आयुष्य पॉझिटीव्ह होते कामातील अडथळे दुर होतात यश सदैव मिळत जाते आर्थिक प्रगती, शैक्षणिक प्रगती व उत्तम आरोग्य याचा लाभ आपल्याला व आपल्या कुटुंबियांना सदैव मिळत जातो.
 • वास्तु विक्री होत नसेल, नवीन वास्तु खरेदी करण्याचा योग येत नसेल, नवीन घर किंवा बांधकाम सुरु होत नसेल तर गणपती ची उपासना नेहमी करावी मंगळवार चा उपवास करावा ओम अंगारकाय नमः हा जप मंगळवारी १०८ वेळा करावा गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन लाल फुल वहावे आणि तुझ्या कृपेने वास्तुचा लाभ लवकरात लवकर होत आहे अशी २१ वेळा प्रार्थना करावी यामुळे गणपतीच्या कृपेने गुण लवकर येतो.
  ओम गणपतेय नमः
 • सकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरामधील स्वयंपाक घर, बेडरूम, हॉल यांची दारे - खिडक्या सकाळच्या वेळेमध्ये उघड्या ठेवाव्यात त्यामुळे संध्याकाळ पासुन सकाळपर्यंत म्हणजे १४ तास घरामध्ये कोंडटलेली दुषित हवा, अशुद्ध ऊर्जा ही घराच्या बाहेर पडते व घरामध्ये सकाळच्या वेळेमधील शुद्ध हवेतील प्राणवायु, प्राणशक्ती आपल्याल्या आणि आपल्या घराला मिळते त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये घरातील सर्व दारे - खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
 • घराचा मुख्य दरवाजा, बेडरूम, बाथरूम यांच्या बिजागिरीतुन आवाज येत असेल किंवा घरातील पंखा, बसण्याचे टेबल, खुर्ची यातुन करकर आवाज येत असेल तर हा आवाज घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार करतो आणि चिड – चिड निर्माण करतो व वादविवाद उद्भवतो त्यामुळे घरातील अशा कोणत्याही वस्तु मधुन आवाज येवु देवु नये त्यामुळे घरामध्ये सुख – समृद्धी शांतता राहते.
 • कारखाना, घर, दुकान, बंगलो साठी प्लॉट विकत घेताना आयताकृती, चौकोनी आकाराचा प्लॉट विकत घ्यावा आणि प्लॉट विकत घेताना प्लॉट ची लांबी दक्षिण आणि उत्तर लांबीची वाढ असलेला प्लॉट विकत घ्यावा पुर्व - पश्चिम लांबीच्या प्लॉट वर दक्षिण दिशेचा वाईट ऊर्जेचा जास्त प्रभाव पडतो आणि त्यामुळे वास्तु तील शुभ ऊर्जेची हानी होऊ शकते म्हणुन कोणत्याही प्रकारचा प्लॉट, शेती किंवा मोकळी जागा विकत घेताना वास्तु तज्ञाच्या सल्याने वास्तु व्हिझिट करून प्लॉट विकत घ्यावा म्हणजेच ती वास्तु लाभते.
 • कारखाना, बंगलो, फ्लॅट ची स्किम, प्लॉटिंग, इंडस्ट्री उभा करणे अशा प्रकारच्या कोणत्याही बांधकामा साठी प्लॉट विकत घेण्या आदी तज्ञा कडून सॉइल टेस्टिंग म्हणजेच माती परीक्षण करून घेणे महत्वाचे आहे भरपुर काळी अशी माती असलेली शेत जमिनी मध्ये बांधकामासाठी पाया १० ते १५ फुटापर्यंत लवकर लागत नाही मातकट, भुरकट थोडीशी लालसर अशी जमीन असेल तर बांधकामासाठीचा पाया ५ ते ६ फुटावरती मिळतो मुरमाड डार्क ब्राऊन आणि दगड गोटे, पाषाण, सदृश अशी जमीन असेल तर पाया १ ते २ फुटावरती लागतो आणि यावरती केलेले बांधकाम भक्कम व टिकाऊ होते त्यामुळे प्लॉट विकत घेताना वास्तु तज्ञाच्या सल्याने विकत घ्यावी आणि जागा लाभदायी होते त्यामुळे आपल्या सुंदर घराचे स्वप्न लवकर पुर्ण होते.
 • घराची बाल्कनी, टेरेस घराच्या आत घेताना किंवा क्लोज करताना ईशान्य, उत्तर, पुर्व आणि आग्नेय अशा दिशा मधील टेरेस, बाल्कनी शक्यतो क्लोज करू नये यातुन येणारा शुभ प्रकाश रोखला जाऊ शकतो त्यामुळे घरामध्ये येणारी शुभ ऊर्जा कायम स्वरूपी बंद होऊ शकते त्यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह घरामध्ये वाढुन विविध प्रकारचे त्रास उत्त्पन्न होऊ शकतात यामुळे दक्षिण, पश्चिम, नैऋत्य दिशेची बाल्कनी क्लोज करणे हे वास्तुच्या दृष्टीने हितकारक राहते.
 • नवीन घरामध्ये फर्निचर ची रचना करताना मुलांची बेडरूम पुर्व, ईशान्य, उत्तर अथवा वायव्येला करावी झोपताना पाय पश्चिमेला आणि डोके पुर्वेला करावे यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती, आरोग्य, उत्साह आणि खेळाडु वृत्ती चांगली राहते आणि मुलांचा उत्कर्ष चांगला होतो.
 • महिलांना आरोग्याच्या समस्या, ताण – तणाव, नैराश्य अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी सकाळच्या वेळेमध्ये घरामध्ये असणाऱ्या तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा सकाळी किंवा सुर्यास्था समयी घालावी प्रदक्षिणा घालताना देवाचे नामस्मरण करावे पायात चप्पल घालु नये अशा प्रदक्षिणा नित्य नियमाने घातल्यामुळे आपल्याला आरोग्य व मन:शांती नियमित लाभते.
 • घराच्या मुख्य उंबऱ्याला सोमवारी किंवा गुरुवारी पाण्यामध्ये हळद कालवुन त्या हळदीचा लेप घराच्या मुख्य दरवाजाच्या लाकडी उंबऱ्यास लावावा आणि दरवाजाच्या बाहेर हळद - कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि दारात सुंदर रांगोळी काढावी यामुळे सुख – समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य घराला लाभते व भाग्योदय होतो.
 • आपल्या घराच्या आतील व बाहेरील वातावरण पवित्र, सात्विक व शुद्ध असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीचे मन विचार आणि कृती चांगली व सकारत्मक राहते आणि त्यामुळे आयुष्यातल्या प्रत्येक टप्यावरती आपल्याल सकारात्मक उर्जेची गरज नेहमी लागते त्यामुळे आपले घर शुद्ध व सकारात्मक असले कि आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी सकारात्मक होतात म्हणुन योग्य वास्तु तज्ञाच्या सल्याने वास्तु कन्सल्टिंग करून घेणे महत्वाचे आहे.
 • घरामध्ये कार, टू – व्हिलर पार्किंग करताना ईशान्य दिशेमध्ये पार्किंग करू नये आग्नेय, नैऋत्य, वायव्येला पार्किंग केले तरी चालेल कार व टू – व्हिलर पार्किंग करताना गाडीचे तोंड उत्तर - पुर्व किंवा ईशान्येला तोंड करून गाडी लावावी आणि दक्षिण दिशेला तोंड करून कोणतेही वाहन लावु नये.
 • घराची ईशान्य दिशा, पुर्व दिशा आणि उत्तर दिशा या अतिशय शुभ दिशा आहेत या दिशांमधुन शुभ प्रवाह घरामध्ये प्रवाहित होत असतो या दिशेतील येणाऱ्या शुभ उर्जेचा व शुभ तत्वांचा घरातील सर्वांच्या सुख – समृद्धी साठी भरपुर उपयोग होतो त्यामुळे घराच्या ईशान्य दिशेमध्ये कुंचा, केरसुनी, फरशी पुसायचे फडके, जुने सामान व डस्ट बिन या गोष्टी ठेवु नयेत या गोष्टी शुभ दिशांमध्ये आल्यामुळे अशुभ तत्व वाढीस लागतात व आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येण्यास सुरवात होते.
 • नवीन घर घेताना हायवे, ओव्हर ब्रीज, खोल दरी, अनेक वर्षापासुन साठवलेले पाण्याचे तळे, पडका किल्ला, पडके बांधकाम, जुन्या मंदिराचे उंच शिखर आणि मोठे हॉस्पिटल अशा गोष्टी नवीन घर घेताना जवळपास नसाव्यात यामुळे आपल्या घरातील अशुभ तत्वाची वाढ होऊन शुभ तत्वाची हानी होते आणि त्यामुळे घरामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.
 • आपल्या घराच्या, ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळ हातात भाला घेतलेल्या माणसाची मुर्ती, तलवार, बंदुका व कोणत्याही प्रकारची शस्त्र घेतलेल्या मुर्ती, पुतळा, चित्रे लावु नयेत मारलेल्या हरीण किंवा प्राण्यांची तोंडे अशा कोणत्याही अशुभ गोष्टी ठेवु नयेत त्यामुळे घरामधील व्यक्तींची क्रुर व दुष्ट प्रवृत्ती जागृत होऊन घरामध्ये त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे वरील सांगितलेल्या गोष्टी घरामध्ये ठेवु नयेत.
 • रात्रीची शांत झोप यावी यासाठी उपाय योजना.
  १) झोपताना पाय दक्षिणेला किंवा पुर्वेला करू नये.
  २) झोपताना पाय उत्तरेला किंवा पश्चिमेला करावे.
  ३) बेड समोर आरसा येवु देवु नये.
  ४) लाल भडक रंगाची चादर किंवा बेडशीट वापरू नये.
  ५) बेड चौकोनी किंवा आयताकृती असावा.
  ६) बेड खाली स्टोरेज नसावे.
  ७) झोपताना मोबाईल, लॅपटॉप, कॉमप्युटर बेडच्या जवळ नसावे .
  ८) झोपताना टी.व्ही झाकुन ठेवावा.
  ९) बेडच्या खाली कागदी कपामध्ये खडे मीठ ठेवावे ते दर १५ दिवसांनी बदलावे.
  १०) झोपण्याच्या आधी देवाचे नामस्मरण करून झोपावे म्हणजे शांत झोप लागते.
  ( रोजची शांत झोप लागणे हे आरोग्याचे चांगले लक्षण आहे )
 • मुलांच्या अभ्यासासाठी वास्तुशास्त्र.
  १) मुलांना अभ्यासाला बसवताना पुर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसवावे.
  २) मुलांनी झोपताना पुर्वेला डोके व पश्चिमेला पाय करावे.
  ३) मुलांची अभ्यासाची खोली ईशान्य दिशेला किंवा मध्य उत्तरेला करावी.
  ४) मुलांच्या रूम मध्ये भडक लाल, भडक काळा अशा भडक रंगाचा वापर करू नये.
  ५) मुलांनी बंक बेड वर झोपु नये.
  ६) मुलांच्या बेडरूमला शक्यतो पुर्वेला व उत्तरेला खिडक्या असणे चांगले असते.
  ७) मुलांची कपाटे उत्तर किंवा पुर्व मुखी असावी.
  ८) मुलांच्या अभ्यासिकेमध्ये किंवा बेडरूम मध्ये जास्त अडगळ भंगार, जास्त वजनी कपाटे ठेवु नये.
  ९) मुलांच्या स्टडी टेबल वरच्या ईशान्येला गणपती, सरस्वती यांचे फोटो किंवा मुर्ती ठेवावी.
  ( मुलांची झोपण्याची जागा योग्य असेल तर त्यांचे आरोग्य चांगले राहु शकते)
 • आरोग्यदायी जीवनासाठी वास्तु टिप्स.
  १) झोपताना पाय दक्षिणेला किंवा पुर्वेला करू नये उत्तरेला करावे.
  २) घरामध्ये अडगळ भंगार, बंद पडलेल्या वस्तु ठेवु नयेत.
  ३) जुन्या चप्पल, शुज फाटले तुटले असतील तर फेकुन द्याव्यात.
  ४) फ्रीजचे तोंड दक्षिणेला करू नये उत्तर किंवा पुर्वेला करावे.
  ५) कोणतेही काम करताना उत्तर किंवा पुर्वेला तोंड करून काम करावे.
  ६) पुर्व, उतर, ईशान्य किंवा आग्नेयेला टॉयलेट आले असेल तर आरोग्य बिघडते यासाठी वास्तु कन्सल्टिंग करून योग्य उपाय करावे.
  ७) बेड खाली अडगळ भंगार, मेटलच्या वस्तु, भांडी, बंद पडलेले पंखे, इस्त्री अशा वस्तु ठेवु नयेत.
  ८) घरामध्ये भडक लाल रंग, भडक काळा व भडक निळा असे रंग कोठेही वापरू नयेत.
  ९) जेवायला बसताना जमिनीवर बसुन जेवण करावे आणि जेवण करताना दक्षिणेला बसुन जेवणे टाळावे.
  १०) घरी शिजवलेले अन्न जास्तीत जास्त खावे बाहेरील जंक फूड टाळावे आहारामध्ये फळांचा वापर जास्त करावा आणि फळे आणल्यानंतर ते वायव्य दिशेत ठेवावे.
  ( उत्तम आरोग्य हीच खरी धन संपत्ती आहे )
Copyright © 2020 Vastu Tathastu
Powered By builtCMS