श्री राजन कदम
श्री राजन कदम (कोल्हापुर)
22-Sep-2015
आपला दररोज सकाळी कोल्हापुर ६. ४५ वाजता टोमॅटो एफ.एम वर आपण सादर करीत असलेला , "वास्तु तथास्तु "हा कार्यक्रम ऐकुन त्याचप्रमाणे या कार्यक्रमातुन आपण दररोज करीत असलेले मार्गदर्शन ,सुचविण्यात येत असलेले सोपे -सोपे तोडगे व त्यातुन होणारे लक्षणीय लाभ याचा अनुभव घेतल्यानंतर आम्हा पती -पत्नीस आपणास भेटण्याची आतुरता लागली त्यानुसार फोनवरून आपली वेळ घेऊन आमची वास्तु पाहण्याची विनंती केली या विनंतीस मान देऊन आपण वेळ देऊन आमची वास्तु आपण पहिली .

वास्तुतील दोष निवारणासाठी आपण सुचविलेले बदल ,त्याचप्रमाणे पिरॅमिड व यंत्रांच्या सहाय्याने आपण केलेल्या उपायांमुळे आश्चर्यकारक बदल लगेचच जाणवले व न होणारी कामे पटापट होऊ लागली त्याचप्रमाणे मुलांचे प्रश्न सोडवण्यास अत्यंत मोलाची मदत झाली .

वास्तुदोष निवारणानंतर आलेल्या आश्चर्यकारक अनुभवांमुळे आपण दिलेल्या बहुमूल्य सल्याबद्दल आमचे कुटुंबिय सदैव ऋणी राहील .

"आपल्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा "
Copyright © 2020 Vastu Tathastu
Powered By builtCMS