साधना कुलकर्णी
साधना कुलकर्णी - पुणे
20-Dec-2019
मी साधना कुलकर्णी रा.सिंहगड रोड - पुणे,  येथे रहायला होते, साधारण वस्ती पातळीवर २ रुम चे घर होते, खूप अडचणी येत होत्या....एक दिवस साम टी.व्ही वर मकरंद सरांचा कार्यक्रम पाहून सरांना घरी बोलवायचे ठरविले....सर घरी येऊन गेल्यानंतर आज ५ वर्षात ३ रा फ़्लॅट घेण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे, यासाठी मकरंद सरांचे खूप खूप आभार....
आशा कदम
आशा कदम - मुंबई
08-Nov-2019
मी आशा कदम, मकरंद सरांची मी खूप आभारी आहे कारण त्यांनी आमची अडचण, आमचे वास्तुमधील दोष समजुन घेऊन आम्हाला समजेल, कळेल अशा शब्दात वर्णन करून मार्गदर्शन केले. घरातील एखादी छोटी किंवा साधी वस्तू देखील म्हणजे दारातील पायपुसणे, इन्व्हर्टर बॅटरी इ. चुकीच्या ठिकाणी आले तर काय होऊ शकते याचा  परिणाम काय होऊ शकतो हे त्यांची व्हिजीट घेतल्यानंतर कळाले. आपल्या वास्तुसाठी दिशा किती महत्वाची असते हे आम्हाला कळाले. त्यांनी ज्याप्रमाणे घरात बदल करण्यास सांगितले त्याप्रमाणे आम्ही केले व आता आमच्या घरात खूप छान, आनंददायी व प्रसन्न वाटत आहे.
अंकिता अनिल चौधरी
अंकिता चौधरी - पुणे
29-Jun-2019
मी अंकिता अनिल चौधरी रा. कोथरूड  पुणे, गेले ८ वर्ष झाले मी जॉब करत होते , मिस्टर ही जॉब करतात पण काही केल्या पैसे बाजूला पडत नसे व आर्थिक प्रॉब्लेम येत असे, त्यामुळे घरचे वातावरण हि बिघडत असे, पण मकरंद सरांचे प्रोग्रॅम पाहून आणि त्यांनी सांगितलेले साधे सोपे उपाय सुरु केल्यामुळे आज मला खूप फायदा झाला आहे, आणि माझ्या आर्थिक अडचणी ही दूर झाल्या आहे त्यामुळे  घरात सर्वजण समाधानी आहे. खरंच सरांचे आभार मानावे तेवढे कमी आहे, माझे खूप प्रॉब्लेम सरांच्या उपायांनी दूर झाले आहेत.
अविनाश शिंदे
अविनाश शिंदे - कोल्हापूर
09-Mar-2019
मी अविनाश शिंदे रा. कोल्हापूर, मधून आहे. मी बिग एफ़ एम वर सकाळी मकरंद सरदेशमुख सरांचा कार्यक्रम ऎकून सरांकडून बांधकामाचा प्लान काढून घ्यायचा विचार केला आणि ती गोष्ट अंमलात आणली. तरी २५०० स्क्वे. फुट चे ३ मजली बांधकाम वेळेच्या आधी कोणतीही अडचण न येता पुर्ण झाले, यासाठी कुणालाही बांधकाम बाबतीत योग्य मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही पण आवर्जुन मकरंद सरदेशमुख सरांचे मार्गदर्शन घ्या....
स्मिता पोवार
कोल्हापुर
24-Feb-2018
मी स्मिता पोवार, रा. कोल्हापुर मध्ये राहते. रोज सकाळी ६.४५ ला टोमॅटो एफ.एम वर वास्तु तथास्तु कार्यक्रम ऎकते. माझ्या घराचे बांधकाम ५ वर्ष झाली तरी पूर्ण होत नव्हते. म्हणून कार्यक्रम ऎकून सरांकडुन घराची वास्तु विझिट करुन घ्यायचे ठरविले. विझिट झाल्यानंतर काही महिन्यांतच माझ्या घराचे बांधकाम पूर्ण झाले, ज्या घराला पूर्ण व्हायला ५ वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला तेच मकरंद सरांच्या मार्गदर्शनामुळे काही महिन्यात पूर्ण झाले. त्यामुळे मी मकरंद सरदेशमुख सरांचे खुप आभार मानते.
मी दिपिका राम शिंदे
पुणे
18-Jun-2017
मी दिपिका राम शिंदे, रा. पुणे - सिंहगड रोड, माझे व माझ्या पतीचे अजिबात पटत नव्हते. आमच्यात सतत वाद-विवाद होत असे. मी मकरंद सरदेशमुख सरांचा साम टी.व्ही वरील प्रोग्राम पाहिला आणि सरांकडून वास्तू विझिट करुन घ्यायची ठरविले. सरांनी विझिट केल्यानंतर आमच्या घरात खूप बदल झाला व आमचे नातेसंबंध सुधारण्यास खुप मदत झाली. सरांनी सांगितलेले बदल, उपासना यांचे नित्यनियमाने पालन केले त्यामुळे आज चांगले दिवस सरांमुळे दिसत आहेत.
अर्पिता देसाई
अर्पिता देसाई (पुणे)
26-Jul-2016
सर आपल्या व्हिझिट नंतर घरात तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदल केल्यावर आमच्या घरात नेहमी होणारी भांडणे , किरकिर ,वाद आता बंद झालेत. घरात खुप समाधानी वाटते.घरातील सगळ्यांचे आता सुरळीत चालले असून, माझ्या मिस्टरांचा व्यवसायही तुमच्या मार्गदर्शनाने चांगला चालला आहे. माझी मुलेपण आता त्रास देत नाही व त्यांची शैक्षणिक प्रगती झाली आहे. माझ्या मिस्टरांचा आजार कमी होऊन रीपोर्ट चांगला आला आहे, ते आता पाहिल्यासारखे घरात चीडचीड करत नाही. घरातील व्यक्तींना हवे नको ते पाहतात.त्यांच्यातील समजूतदारपणा वाढला आहे. आमच्या घरात आर्थिक सुधारणा झाली आहे. त्याबद्दल मी तुमची खुप आभारी आहे. आमच्या घराला समाधानी, आनंदी बनविल्या बद्दल मी तुमची शतशः आभारी आहे .सर फक्त हे तुमच्यामुळे शक्य झाले. धन्यवाद.
श्री अजित शहा
श्री अजित शहा ( विटा )
26-Jul-2016
कलश मंगल कार्यालय विटा

डिसेंबर २०१५ मध्ये मकरंद सरदेशमुख सरांनी आमच्या प्लॉट ची व्हिझिट करून पुर्ण वास्तुशास्त्र नुसार मंगल कार्यालयचा प्लान काढुन दिला. त्यानुसार आम्ही पाया काढुन काम सुरु केले. हे काम विना अडथळे पुर्ण झाले.
वास्तुशास्त्रानुसार प्लॅन केल्यामुळे २ माजली कार्यालयाचे काम ६ महिन्यात पुर्ण झाले. बांधकाम सुरु झाल्यापासून शारीरिक, मानसिक, आर्थिक कोणतीही अडचण आली नाही.जमिनीतील वास्तु दोषांवर उपाययोजना व बदल सांगितले त्यामुळे आमचे बांधकाम वेळेत व योग्य बजेट मध्ये पुर्ण झाले. याबद्दल मी सरांचे मनापासून खुप आभार मानतो.
भास्कर गायकवाड
भास्कर गायकवाड ( पुणे )
05-Jul-2016
सरांची व्हिझिट होण्या आधी आमची घरची परिस्थिती खुप गरिबीची होती. आमचे १० वर्षापासुनचे कर्ज रखडले होते आणि २००५ पासुन कोर्ट प्रकरण चालु होते आमचे कोणतेही काम सुरळीत पार पडत नव्हते. आम्ही एक दिवस सरांचा साम टी.व्ही वर कार्यक्रम पहिला आणि एकदाच पाहताच आम्हाला सरांचा कार्यक्रम खुप आवडला आणि तेव्हाच आम्ही सरांची व्हिझिट करण्याचे ठरवले आणि आम्ही सरांची व्हिझिट घेण्यासाठी नाव नोंदवले आणि सर जेव्हा आमच्या घरी व्हिझिट करण्यासाठी आले तेव्हा त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला खुप आवडली आमच्या घरातील सर्व अडचणी सरांनी खुप चांगल्या पद्धतीने समजुन घेऊन त्यावर खुप चांगल्या साध्या-सोप्या उपाय योजना सांगितल्या आणि आमची व्हिझिट झाल्यानंतर बरोबर १० दिवसांनी आमच्या सर्व अडचणी दुर होऊ लागल्या सर्व कामे हळुहळु मार्गी लागत गेली आणि आमचे जे १० वर्षापासुनचे कर्ज होते ते हि फिटले आणि आमच्या कोर्ट - कचेऱ्या कायमच्या बंद झाल्या आणि हे फक्त सरांमुळे झाले आणि सरांचे मार्गदर्शन आम्हाला अजुनही मिळत आहे सर तुमचा असाच आशिर्वाद आमचा घरावर राहू द्देत.

मनपुर्वक आभार
अमर गव्हाणे
अमर गव्हाणे ( पुणे )
05-Jul-2016
माझा व्यवसाय गेली २८ वर्षापासुन चालु आहे पण व्यवसायामध्ये काहीच प्रगती नव्हती मला खूप समस्यांना सामोरे जावे लागत होते ग्राहकांकडून येणारे पैसे ही नीट येत नव्हते माझ्या ऑफिस मध्ये काम करणारे कामगार ही मला पाहिजे तसे आणि त्यांचे शिक्षण हवे तसे मला मिळत नव्हते. हि सर्व परिस्थिती पाहून माझे ही काम करण्यात लक्ष लागत नव्हते आणि मी एक दिवस ग्राहक पेठ, टिळक रोड पुणे येथे असलेला तुमचा फ्लेक्स पहिला होता तेव्हा मी एकदा व्हिझिट करून घेण्यास काय हरकत आहे या उद्देशाने मी सरांनच्या ऑफिस मध्ये फोन केला तेव्हा सरांनी खुप शांतपणे माझ्या सर्व अडचणी समजुन घेऊन माझ्या ऑफिसला व्हिझिट दिली. सरांनी सांगितलेले सर्व बदल मी ऑफिस मध्ये केले आणि व्हिझिट झाल्यानंतर सहा महिन्यांनी माझे ऑफिस खुप छान सुरु झाले आणि हे फक्त मकरंद सरदेशमुख सरांनमुळे झाले आहे मी सरांनचा खुप आभारी आहे.
 
 Page 1 of 2 
Copyright © 2020 Vastu Tathastu
Powered By builtCMS